मुंबई : एकनाथ शिंदे यांचा प्रस्ताव शिवसेना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाकारला आहे. त्यानंतर शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्यावर मोठी कारवाई करत गटनेता पद त्यांच्याकडून काढून घेण्यात आला असून त्यांच्या जागी आता अजय चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर लगचेच एकनाथ शिंदे यांनी मोठी भूमिका घेतली असून त्यासंदर्भात त्यांनी शिवसेनेला सुचक इशाराही दिला आहे.
“शाब्बास एकनाथजी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता”
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी अस म्हटलं आहे की, आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
“एकनाथ शिंदे यांच्यासह सेनेचे सर्व आमदार संपर्कात, भाजपचा डाव यशस्वी होणार नाही”
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 35 आमदारांना घेऊन सुरतमध्ये दाखल झाल्याने ठाकरे सरकारसमोर धर्मसंकट उभे राहिले आहेत. गुजरातमध्ये त्यांना भाजपकडून कडक सुरक्षा देखील पुरवण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांना गुजरातमध्ये ठेवण्याचा भाजपचाच डाव असल्याची माहिती समोर येत आहे.
आघाडीत मोठा भुकंप; एकनाथ शिंदे यांच्यासह सेनेचे 13 पेक्षा अधिक आमदार नॉट रिचेबल
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत येऊन सरकार स्थापन करावे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद तर एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात यावे. असे झाल्यास आम्ही शिवसेनेतच राहणार. जर हा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांनी नाकारला तर पुढची भूमिका आज पत्रकार परिषदेत मांडणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसची साथ नको, असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
Read also:
- एकनाथ शिंदें यांच्या बंडामागे चंद्रकांत पाटलांचा हात; भाजपचे अध्यक्ष नड्डा अन् अमित शहांशी भेट घेणार
- “एकनाथ शिंदेंचं बंड हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न,शिवसेनेशी लवकरच चर्चा करणार”
- फडणवीसांना मुख्यमंत्री पद, शिंदेना उपमुख्यमंत्री; राष्ट्रवादी अन् काॅंग्रेसची साथ नकोच; एकनाथ शिंदेनी घातल्या अटी
- “सत्ता येते जाते, कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही;” राज ठाकरेंचं वक्तव्य चर्चेत
- एकनाथ शिंदे यांच्यासोबत सेनेसह एकूण 35 आमदार; वाचा संपुर्ण यादी