मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 35 आमदारांना घेऊन सुरतमध्ये दाखल झाल्याने ठाकरे सरकारसमोर धर्मसंकट उभे राहिले आहेत. गुजरातमध्ये त्यांना भाजपकडून कडक सुरक्षा देखील पुरवण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांना गुजरातमध्ये ठेवण्याचा भाजपचाच डाव असल्याची माहिती समोर येत आहे.
“एकनाथ शिंदे यांच्यासह सेनेचे सर्व आमदार संपर्कात, भाजपचा डाव यशस्वी होणार नाही”
एकनाथ शिंदे यांनी सेनेच्या आमदारांना घेऊन थेट सुरत गाठलं. त्यानंतर भाजपचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. भाजपची पडद्यामागून सगळी सुत्रे ही चंद्रकांत पाटील संभाळत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा सध्या खुप रंगली आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे चंद्रकांत पाटलांचाच हात असल्याची माहितीही समोर आली आहे.
आघाडीत मोठा भुकंप; एकनाथ शिंदे यांच्यासह सेनेचे 13 पेक्षा अधिक आमदार नॉट रिचेबल
नरेंद्र मोदी 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या वाराणसी विकासाचा सर्व कारभार चंद्रकांत पाटलांकडे सोपवण्यात आला होता. तसेच नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या निकटवर्तीय चंद्रकांत पाटलांची ओळख आहे. ते मुळचे खानदेश जळगाव जिल्हातील असून त्यांच्याकडे गुजरातमध्ये प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी 20 जूलै 2020 रोजी सोपवण्यात आली आहे. 2009 पासून ते भाजपच्या तिकीटावर सुरत- नवसारी लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले आहेत.
राष्ट्रवादीची पहिल्या पंसतीची मते निंबाळकर यांना, खडसेंना दुसऱ्या पसंतीची मते
दरम्यान, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीसमोर मोठं संकट उभे राहिले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास 35 आमदार हे सुरतमध्ये असल्याची माहिती समोर येत असून सायंकाळी एकनाथ शिंदे भाजपचे अध्यक्ष जे, पी, नड्डा आणि अमित शहा यांची देखील भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
Read also:
- “एकनाथ शिंदेंचं बंड हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न,शिवसेनेशी लवकरच चर्चा करणार”
- फडणवीसांना मुख्यमंत्री पद, शिंदेना उपमुख्यमंत्री; राष्ट्रवादी अन् काॅंग्रेसची साथ नकोच; एकनाथ शिंदेनी घातल्या अटी
- “सत्ता येते जाते, कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही;” राज ठाकरेंचं वक्तव्य चर्चेत
- एकनाथ शिंदे यांच्यासोबत सेनेसह एकूण 35 आमदार; वाचा संपुर्ण यादी
- “शाब्बास एकनाथजी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता”