नवी दिल्ली : विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच आज केंद्रात विरोधी पक्षांनी राष्ट्रपती निवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे तृणमुल काॅंग्रेसचे नेते यशंवत सिन्हा यांच्या नावाची घोषणा राष्ट्रपती निवडणुकीसाठी काॅंग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केली आहे. यासंदर्भात आज दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांची बैठक झाली.
गेल्या अनेक दिवसापासून राष्ट्रपती पदासाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी बैठका सुरू होत्या. यामध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्स चे प्रमुख फारूख अब्दुल्ला आणि महात्मा गांधी यांचे नातू गोपाळकृष्ण गांधी यांचा समावेश होता. या तिन्ही नेत्यांना विरोधी पक्षातील नेत्यांनी पाठिंबा दिला होता. मात्र या तिन्ही नेत्यांनी उमेदवारी मान्य केली नाही. त्यानंतर आता राष्ट्रपती पदासाठी यशंवत सिन्हा यांच्या नावावर शिक्कामोर्ताब झाल आहे.
“सत्ता येते जाते, कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही;” राज ठाकरेंचं वक्तव्य चर्चेत
राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर यशंवत सिन्हा यांनी तृणमुल काॅंग्रेसच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे पाठवला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत अद्याप त्यांनी काहीही भाष्य़ केले नाही. त्याचबरोबर दुसरीकडे भाजपने आज संसदीय मंडळाची बैठक बोलवली आहे. त्यात राष्ट्रपती पदासाठी उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत सेनेसह एकूण 35 आमदार; वाचा संपुर्ण यादी
दरम्यान, राष्ट्रपती निवडणुकसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २९ जून असून त्यासाठी १८ जुलै रोजी मतदान होणार आहे. त्या निवडणुकीची मतमोजणी ही २१ जुलै रोजी होणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ हा २४ जुलै रोजी संपत आहे.
Read also:
- “शिवसेनेच्या काही आमदारांचा खुन देखील होऊ शकतो”; संजय राऊतांचं धक्कादायक वक्तव्य
- एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेची मोठी कारवाई, गटनेता पदावरून हाकालपट्टी
- “बाळासाहेबांची अन् दिघे साहेबांची शिकवण, आम्ही सत्तेसाठी..” एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका
- एकनाथ शिंदें यांच्या बंडामागे चंद्रकांत पाटलांचा हात; भाजपचे अध्यक्ष नड्डा अन् अमित शहांशी भेट घेणार
- “एकनाथ शिंदेंचं बंड हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न,शिवसेनेशी लवकरच चर्चा करणार”