मुंबई : राज्यात जोरदार हालचाली होत असताना राज्याचे अजित पवारांनी भाजपला दे धक्का दिला आहे. अजित पवार यांच्या उपस्थित आज भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची बंडखोरी एका बाजूला असताना अजित पवारांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना गळाला लावल्याची माहिती समोर येत आहे.
एकनाथ शिंदें यांच्या बंडामागे चंद्रकांत पाटलांचा हात; भाजपचे अध्यक्ष नड्डा अन् अमित शहांशी भेट घेणार
अहमदनगर जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि मधूकर पिचड यांच्या काही समर्थकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये अहमदनगर तालुक्यातील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब हराळ, अकोले तालुक्यातील कैलास वाकचौरे व वसंतराव मनकर यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिली आहे.
“एकनाथ शिंदेंचं बंड हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न,शिवसेनेशी लवकरच चर्चा करणार”
यावेळी नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीप, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे, माजी आमदार राहुल जगताप, घनश्याम शेलार, सीताराम गायकर, अशोक भांगरे, कपिल पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके उपस्थित होते. राधाकृष्ण विखे पाटील आणि मधूकर पिचड यांचे हे कार्यकर्ते असल्याने दोघांनाही हा धक्का मानला जात आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर या नेत्यांनी प्रवेश केला असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, आज दिवसभर एकनाथ शिंदे आणि शिवसेना यांच्याच जोरदार राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. यामध्ये अजित पवार कुठे आहेत.? असा देखील सवाल उपस्थित केला जात होता. मात्र अजित पवारांनी भाजपच्याच काही कार्यकर्त्यांना गळाला लावल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Read also:
- एकनाथ शिंदेंचं सुरतमधील ठिकाण बदलणार; 3 चार्टर विमानं 14 फॉर्च्युनर गाड्या तयार
- राष्ट्रपती पदासाठी यशंवत सिन्हा यांच नाव जाहीर; शरद पवारांच्या उपस्थित झाली बैठक
- “शिवसेनेच्या काही आमदारांचा खुन देखील होऊ शकतो”; संजय राऊतांचं धक्कादायक वक्तव्य
- एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेची मोठी कारवाई, गटनेता पदावरून हाकालपट्टी
- “बाळासाहेबांची अन् दिघे साहेबांची शिकवण, आम्ही सत्तेसाठी..” एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका