मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर राज्यात राजकीय पक्ष सतर्क झाले आहेत. एकनाथ शिंदे यांचं बंड यशस्वी झालं तर भाजप सरकार सत्ता स्थापन करण्याचा दावा करू शकतो. त्यामुळे भाजपच्या आमदारांना आता परराज्यात हलवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना गोव्यात किंवा गुजरातमध्ये नेण्यात येणार आहे.
“बाळासाहेबांची अन् दिघे साहेबांची शिकवण, आम्ही सत्तेसाठी..” एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात येऊ शकतात. त्यामुळे वेळ आली तर भाजप सरकार स्थापन करण्याचा दावा करू शकतो. त्यामुळे भाजपच्या काही आमदारांना भाजपची सत्ता असलेल्या राज्यांत पाठवण्यात येणार असल्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यांच्याशी कोणीही संपर्क साधू नये म्हणून भाजपकडून काळजी घेतली जात असल्याची माहिती समोर येत आहे.
एकनाथ शिंदें यांच्या बंडामागे चंद्रकांत पाटलांचा हात; भाजपचे अध्यक्ष नड्डा अन् अमित शहांशी भेट घेणार
दुसरीकडे काॅंग्रेसच्या नेत्यांना देखील तातडीने मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. तसेच काॅंग्रेसच्या आमदारांचं लोकेशन ट्रक केलं जात असून भाजपच्या गळाला लागले नाहीत ना, याची चाचपाणी देखील काॅंग्रेसकडून करण्यात येत आहे. तसेच शिवसेनेच्या आमदारांची देखील बैठक वर्षा बंगल्यावर आताच थोड्या वेळात पार पडली असून खासदारांसह आमदारांना देखील आता पु्न्हा एकाच ठिकाणी बोलवण्यात येत आहे.
“एकनाथ शिंदेंचं बंड हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न,शिवसेनेशी लवकरच चर्चा करणार”
दरम्यान, एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्यासाठी शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक सुरतला गेले असून त्यांच्यात चर्चा सुरू झाली आहे. त्याआधी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसमोर प्रस्ताव ठेवला होता. मात्र तो प्रस्ताव शिवसेनेने फेटाळून लावला आहे. त्यामुळे सायंंकाळी पक्षकार परिषदेत एकनाथ शिंदे पुढची भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.
Read also:
- एकनाथ शिंदेंमुळे महाराष्ट्रात राजकीय भुकंप; दुसरीकडे अजित पवारांचा भाजपाला दे धक्का
- एकनाथ शिंदेंचं सुरतमधील ठिकाण बदलणार; 3 चार्टर विमानं 14 फॉर्च्युनर गाड्या तयार
- राष्ट्रपती पदासाठी यशंवत सिन्हा यांच नाव जाहीर; शरद पवारांच्या उपस्थित झाली बैठक
- “शिवसेनेच्या काही आमदारांचा खुन देखील होऊ शकतो”; संजय राऊतांचं धक्कादायक वक्तव्य
- एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेची मोठी कारवाई, गटनेता पदावरून हाकालपट्टी