मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंडाची भूमिका घेतल्यानंतर राज्यात मोठी खळबळ माजली आहे. कालपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार घडामोडी घडू राहिल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांना आता आसाममधील गुवाहाटी याठिकाणी हलवण्यात आले आहे. ते आज सांयकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार होती. मात्र त्याआधीच उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे अन् मुख्यमंत्री यांच्यात 20 मिनिटे फोनवर चर्चा; उद्धव ठाकरे लवकरच निर्णय घेणार?
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील सरकार कोसळणार असल्याचे सुचक वक्तव्य केले आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट देखील केले आहे. त्यात असं म्हटलं आहे की, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीचया दिशेने, असं त्यात त्यांनी म्हटलं आहे. आज उद्धव ठाकरे एक वाजता पत्रकार परिषदेमध्ये आपली पुढची भुमिका स्पष्ट करणार असून ते मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.
“संजय राऊतांचा आवाज आज बसलाय, उद्या बंद होणार”; नारायण राणेंचा राऊतांना टोमणा
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाविका आघाडीचे सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने आता राजकीय हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत. आपल्या आमदारांनासह अपक्ष आमदारांना भाजपने सागर बंगल्यावर बोलवण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे अमित शहा यांच्याशी चर्चा करणार आहेत. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत.
“उद्धव ठाकरेंनी आता मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा”; केंद्रीय मंत्री नारायण राणेंची मागणी
त्याआधी भाजपकडून बैठक सत्र सुरू झाल्याने महाविकास आघाडीकडून देखील मोठ्या नेत्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांची बैठक आताच पार पाडली आहे. तसेच आता राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना देखील एकाच ठिकाणी बोलवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तसेच कॉंग्रेच्या आमदारांना देखील अशाच प्रकारच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीचया दिशेने..
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 22, 2022
Read also:
- भाजपकडून संख्याबळ तपासण्याचे आदेश; महाविकास आघाडी सरकार कोसळणार?
- आघाडीचा खेळ खल्लास; आदित्य ठाकरेंनी ट्विटरवरून पर्यावरणमंत्री पद हटवलं
- एकनाथ शिंदे भेट घेण्याअगोदर राज्यपालांना कोरोनाची लागण; राजभवन कोरोनंटाईन
- शिवसेनेचे बंडखोर नेते, ज्यांनी आतापर्यंत पाच वेळा शिवसेना फोडली; वाचा सविस्तर
- 21 जुन वर्षातला सर्वात मोठा दिवस, की ‘वर्षा’तला शेवटचा दिवस; मनसेचा खोचक सवाल