मुंबई : विधान परिषदेच्या निकालानंतर मला जबरदस्तीने हॉटेलमधून बाहेर नेण्यात आलं. त्यानंतर वीस ते तीस जणांनी बळजबरीने मला पकडून माझ्या दंडावर इंजक्शेन टोचलं. त्या इंजेक्शनाची मला कोणतीही माहिती नव्हती. माझ्या शरीरावर चुकीच्या पद्धतीचं षड़यत्रं त्या लोकांचं होतं. परंतु त्याठिकाणांहून मी कसातरी निसटलो, मी उद्धव ठाकरे यांची शिवसैनिक असून आज, उद्या आणि भविष्यात देखील राहणार, असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांच्या गटातील शिवसेनेचे नेते नितीन देशमुख यांनी केले आहे.
शिवसेनेचे बंडखोर नेते, ज्यांनी आतापर्यंत पाच वेळा शिवसेना फोडली; वाचा सविस्तर
नितीन देशमुख आणि कैलास पाटील हे आता उद्धव ठाकरे यांच्या गटात आले असून त्यांनी एकनाथ शिंदे यांना तुरी दिली आहे. सोमवारी विधान परिषदेसाठी मतदान पूर्ण झाल्यानंतर शिवसेनेतीलच काही नेत्यांनी डिनरसाठी ठाण्याला जायचे आहे, असे आमदारांना सांगितले. यानंतर सायंकाळी वेगवेगळ्या वाहनांमध्ये बसवून बस ठाण्याच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आली. ठाणे ओलांडून पुढे गेल्यानंतरही बस थांबत नव्हती. असं कैलास पाटील यांनी म्हटलं आहे.
21 जुन वर्षातला सर्वात मोठा दिवस, की ‘वर्षा’तला शेवटचा दिवस; मनसेचा खोचक सवाल
त्यानंतर त्या लोकांपासून कसातरी सुटून कैलास पाटील हे महाराष्ट्र-गुजरात सीमेवर बस थांबविण्यात आली होती. याचवेळी कैलास पाटील यांच्या मनात शंका आली. त्यानंतर त्यांनी अंधारात कोणालाही दिसणार नाही. अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या दिशेने त्यांनी पायी प्रवास सुरू केला आणि उद्धव ठाकरे यांच्याजवळ येऊन झालेला सर्व प्रकार सांगितला.
एकनाथ शिंदे अन् मुख्यमंत्री यांच्यात 20 मिनिटे फोनवर चर्चा; उद्धव ठाकरे लवकरच निर्णय घेणार?
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आता 47 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील देखील गुवाहाटीला रवाना झाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र विधानसभा बरखास्त करण्याच्या हालचाली सुरू केल्याची माहिती देखील समोर आली आहे.
Read also:
- शरद पवारांचं स्वप्न पुर्ण.. शिवसेना संपली; मनसेचं सुचक वक्तव्य
- उद्धव ठाकरे लवकरच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार ? संजय राऊतांचं सुचक वक्तव्य
- भाजपकडून संख्याबळ तपासण्याचे आदेश; महाविकास आघाडी सरकार कोसळणार?
- आघाडीचा खेळ खल्लास; आदित्य ठाकरेंनी ट्विटरवरून पर्यावरणमंत्री पद हटवलं
- एकनाथ शिंदे भेट घेण्याअगोदर राज्यपालांना कोरोनाची लागण; राजभवन कोरोनंटाईन