मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना आता शिवसेनेकडून पत्र पाठवण्यात आलं आहे. त्यात सर्व आमदारांना आज 5 पर्यंत मुंबईत दाखल होण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा कारवाई करण्यात येईल, अशा पद्धतीचा देखील इशारा शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना दिला आहे.
आघाडीचा खेळ खल्लास; आदित्य ठाकरेंनी ट्विटरवरून पर्यावरणमंत्री पद हटवलं
सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर पक्षांतर घडवून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याने आणि त्यामुळे राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता अशा परिस्थिततीला सामोरे जाण्यासाठी बुधवार दि. २२ जून २०२२ रोजी, वर्षा बंगला, माऊंट प्लेझंट रोड, मुंबई ४००.००६ येथे सायंकाळी ०५.०० वाजता तातडीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस आपली उपस्थिती आवश्यक आहे याची नोंद घ्यावी. सदर सूचना आपण महाराष्ट्र विधानसभेत नोंदणी केलेल्या ई-मेल पत्यावर पाठविली आहे
एकनाथ शिंदे भेट घेण्याअगोदर राज्यपालांना कोरोनाची लागण; राजभवन कोरोनंटाईन
त्या व्यतिरीक्त आपण समाज माध्यमे, व्हॉट्स अॅप आणि एस. एम. एस. द्वारेही कळविली •आहेत. या बैठकीस लिखित स्वरुपात वैध आणि पुरेशी कारणे प्रदान केल्याशिवाय आपणास गैरहजर रहाता येणार नाही. सदरहू बैठकीस आपण उपस्थित न राहिल्यास आपण स्वेच्छेने शिवसेना पक्षाच्या सदस्यत्व सोडण्याचा तुमचा स्पष्ट इरादा आहे असे मानले जाईल आणि परिणामी आपणावर भारतीय संविधानातील सदस्यांच्या अपात्रते संदर्भात असलेल्या तरतूदी नुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. असं त्या पत्रात म्हटलं आहे.
शिवसेनेचे बंडखोर नेते, ज्यांनी आतापर्यंत पाच वेळा शिवसेना फोडली; वाचा सविस्तर
दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलण्याचं टाळलं आहे. त्यावर त्यांना नो कमेंट्स असं सांगत प्रसार माध्यामांशी बोलण्याचं टाळलं आहे. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी महाराष्ट्रातील विधानसभा बरखास्त होण्याच्या मार्गावर असल्याचं सुचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील सरकार कोसळणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Read also:
- उत्तर महाराष्ट्राची बुलंद तोफ शिंदे गटात सामील; ४७ आमदार सोबत असल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा
- जबरदस्तीने माझ्या अंगावर इंजेक्शन टोचले; एकनाथ शिंदे गटातील आमदारांचा आरोप
- शरद पवारांचं स्वप्न पुर्ण.. शिवसेना संपली; मनसेचं सुचक वक्तव्य
- उद्धव ठाकरे लवकरच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार ? संजय राऊतांचं सुचक वक्तव्य
- भाजपकडून संख्याबळ तपासण्याचे आदेश; महाविकास आघाडी सरकार कोसळणार?