मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बंडखोर आमदारांपैकी एका आमदारांनी जरी सांगितले तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री नको तर आज मी वर्षावरील मुक्काम मातोश्रीवर हालवत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. हिंदुत्वाबाबत विधिमंडळात बोलणारा मी कदाचित पहिला मुख्यमंत्री असेन. तसेच बाळासाहेबांची शिवसेना आता राहिलेली नाही, असा काही लोकांकडून भासवण्याचा प्रयत्न केला जात आहे. काल हिंदु, आज हिंदु आणि उद्या देखील हिंदुच राहणार. सध्याचं राज्यात ज्या काही राजकीय घडामोडी घडत आहेत. त्याबाबत मला काही बोलायचं नाही. तसेच गेल्या काही दिवसात विधान परिषदेची निवडणुक झाली. त्यावेळी काही शिवसैनिक हॉटेलमध्ये थांबले होते. तेव्हा काही आमदार बाहेर गेले तरी त्यांच्यावर शंका घेतली गेली.
“ठाकरेंनी आता ‘मातोश्री 11’ नाव देऊन IPL ची तयारी करावी”; निलेश राणेंचा शाब्दिक टोला
2019 च्या विधान सभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर शरद पवारांनी मला बाजूला घेतलं. आणि सांगितलं की उद्धव साहेब जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागणार. तसेच शिवसेनेकडून इतर कुणाला दिलं तर ते कठीण आहे. महापालिकेत उमेदवार जिंकल्यानंतर देखील त्यांचं अभिनंदन कऱण्यासाठी जातो. त्यामुळे महाापालिकेत देखील नसणारा नेता मुख्यमंत्री कसा होणार. ? असा सवाल त्यांनी केला.
बंडखोर आमदारांना शिवसेनेचा शेवटचा इशारा, सायंकाळी 5 पर्यंत मुंबईत या अन्यथा..;
जिद्द आणि त्यानंतर शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी माझ्यावर टाकली. मात्र जे काही सध्या रंडकुंडीचं राजकारण चालू आहे. त्याचं कुणाला उपयोग होत नाही, शरद पवार यांनी माझ्यावर भरोसा ठेवला आणि माझ्याच लोकांना मुख्यमंत्री मी नको असेल तर पुढे काय करायचं? त्यामुळे त्यांना सुरत किंवा गुवाहाटीला जाऊन सांगण्याची काय गरज होती? की उद्धवजी तुम्ही कारभार करण्यासाठी नालायक आहेत ? मग त्यांनी माझ्यासमोरच सांगायला काय झालं होतं? जर असं असेल तर त्यांच्यातील एका आमदारांनी मला सांगितलं की तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री नको आहे. तर आज सांयकाळी माझा वर्षावरील मुक्काम मातोश्रीवर हलवत आहे.
जबरदस्तीने माझ्या अंगावर इंजेक्शन टोचले; एकनाथ शिंदे गटातील आमदारांचा आरोप
बंडखोर आमदारांनी देखील ठणकावून सांगितलं आहे. तसेच शिवसैनिकांना वाटत असेल तर मी पक्ष प्रमुख पद सोडायला तयार आहे. यामधून जर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर त्याचा मला आनंदच आहे. त्यामुळे शिवसेनेचे लाकूड वापरून शिवसेनेवर वार करू नका. अशा इशारा देखील त्यांनी शिवसेना आमदारांना दिला आहे.
Read also:
- “मी कसं काय बंड करेन, तुमच्या कुटुंबासाठी जीवदेखील देऊ शकतो”; एकनाथ शिंदें अन् मुख्यमंत्र्यांमध्ये संवाद
- “शिवसेेनेचे सर्व आमदार शिंदेंसोबत फक्त पैशासाठी गेलेत”; इम्तियाज जलीलांचा नवा आरोप
- हिंदुत्वाच्या वनवासात ठाकरे अन् शिंदे राम लक्ष्मण जोडीसारखे, शिवसैनिकांनो रडायचे नाही
- सेना अन् शिंदे गटात टोकाचा संघर्ष; एकनाथ शिंदेंनी विधिमंडळाचा मुख्यप्रतोद नेताच बदलला
- मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचा अखेरचा नमस्कार ? म्हणाले.. “अशीच साथ राहु द्या”