मुंबई : महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासाठी तयार असल्याचं वक्तव्य आता शिवसेना खासदार संजय राऊतांनी केलं आहे. बंडखोर आमदारांनी येत्या 24 तासात महाराष्ट्रात आल्यावर निर्णय घेऊ असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे. यावर आता काॅंग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. लवकरच सह्याद्री अतिती गृहावर काॅंग्रेसची बैठक बोलवली आहे.
भाजपची अट, बंडखोर शिंदेगट भाजपमध्ये विलीन झाला तरच सरकार स्थापन; प्रकाश आंबेडकरांचं ट्विट
संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यावर माजी मुख्यमंत्री आणि काॅंग्रसेचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेचे कोणतेही प्रवक्ते येतात आणि म्हणतात की तुम्ही 24 तासात या आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडू. याबाबत निर्णय हा पक्षश्रेष्ठींनी घ्यायला हवेत. तसेच काल मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थान सोडल्याचं घटक पक्षांना देखील कळवायला हवं होतं. असंही चव्हाण म्हणाले.
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवा; पवारांचा ठाकरेंना सल्ला, शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष
आज झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी गुवाहाटी येथे असणाऱ्या आमदारांना महाराष्ट्रात येण्याचं आव्हान दिलं आहे. येत्या 24 तासात येऊन उद्धव ठाकरे यांच्या समोर आपली भूमिका मांडा. त्यानंतर आपण महाविकास आघाडीतून अधिकृतपणे बाहेर पडू. त्यासाठी तुम्ही अगोदर महाराष्ट्रात येण्याची हिंमत दाखवा. गुवाहाटी येथून कोणताही पत्रव्यवहार करू नका. अंस राऊतांनी म्हटलं आहे.
“सेनेच्या बंडखोर आमदारांना सोमय्यांकडे कपडे नेऊन देण्याची जबाबदारी”; राष्ट्रवादीने भाजपला डिवचलं
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात मोठा भुंकप आला आहे. अशातच आज बंडखोर आमदारांना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात येण्याचं आव्हान दिलं आहे. त्याचबरोबर तुमची भूमिका उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडा, त्यानंतर आपण लगेचच महाविकास आघाडीतून बाहेर पडू, असा इशारा देखील संजय राऊतांनी दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास आता शिवसेनेचे 42 आमदार असून शिवसेनेकडे फक्त 14 आमदार उरले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल फेसबुकच्या माध्यामांतून आपली भूमिका मांडली आहे. त्यानंतर लगेचच शिंदे गटातील आमदारानी आज मुख्यमंत्र्यांच्या पत्राला उत्तर दिलं आहे. त्यात त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसबाबत गरळ ओकळी आहे.
Read also:
- मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आव्हानाला एकनाथ शिंदे गटाचं थेट प्रत्युत्तर, म्हणाले..;
- मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आव्हानाला एकनाथ शिंदे गटाचं थेट प्रत्युत्तर, म्हणाले..;
- शिंदे गटाचा आता थेट धनुष्यबाणावरच दावा; शिवसेना पक्षच एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात
- शिंदे गटाला भाजपची मोठी ऑफर; 8 कॅबिनेट, 5 राज्यमंत्री अन् केंद्रात 2 मंत्रीपद
- राज्यातील सर्वात मोठ्या बंडांचा रविवारी शपथविधी होणार ?