मुंबई : देवेंद्र फडणवीस पुन्हा आले पण त्या पदावर आले नाहीत, खालच्या पदावर आले. तसंच नरेंद्र मोदी मी पुन्हा येईन म्हणाले, त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं मार्गदर्शन घेतलं असेल. आता त्यांनी कोणत्या पदावर यायचा विचार केला आहे? हे मी सांगू शकत नाही. मोदींची स्थिती देवेंद्र फडणवीसांच्या मी पुन्हा येईन सारखी होईल, असा खोचक टोला शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे. त्यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…“पुढचा स्वांतत्र्या दिनाचा सोहळा मोदी माजी पंतप्रधान म्हणून गुजरातच्या घरी पाहतील”
ज्या शरद पवार यांना आपल्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा टिकवता आला नाही ते पवार साहेब आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करीत आहेत. पवार साहेब तुम्ही राजकारण करताना कायम साडेतीन जिल्ह्यांचाच विचार केला आणि आज भाजप देशभरात कुठल्या राज्यात आहे आणि कुठल्या राज्यात नाही हे गणित सांगत सुटला आहात. मोदी पुन्हा येणार नाहीत, असं भाकीत तुम्ही केलं, पण तुमचं हे भाकीत खरं होणार नाही. कारण जनता मोदीजींच्या पाठीशी कालही होती आणि आजही आहे. असं बावनकुळे यांनी म्हटलंय.
हेही वाचा…“मुंबई गोवा महामार्गावर १५६६६ हजार कोटी खर्च, आमदार काय करतात?” राज ठाकरेंचा सवाल
दरम्यान, समाजात द्वेष निर्माण करण्याचं काम कुणी केलं हे महाराष्ट्रातील जनतेनं तुमचं सरकार असताना पाहिलंय. त्यामुळे मोदीजींकडे बोट दाखवण्यापूर्वी एकदा आपली कारकीर्द तपासून बघा. बाकी परिवार बचाव पार्टीला सोबत घेऊन तुम्ही कितीही ‘ घमंडीया‘ ची मोट बांधण्याचा प्रयत्न केला तरीही देशातील जनता २०२४ मध्ये सुद्धा मोदीजी आणि भाजपला साथ देईल. याबाबत आपण निश्चिंत राहावे. असंही त्यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“भाजपाला सत्तेतून उखडून टाकून काँग्रेसची सत्ता आणणे हाच काँग्रेसचा प्लॅन”
हेही वाचा…“शिरूर मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा,” ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी
हेही वाचा…“मोदींची स्थिती देवेंद्र फडणवीसांच्या मी पुन्हा येईन सारखी होईल”, शरद पवारांचा खोचक टोला
हेही वाचा…कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम, विरोधकांची टिका, अजित पवार भेट, शरद पवारांनी मांडली आपली भूमिका
हेही वाचा…कॅगकडून नरेंद्र मोदींच्या सरकारमधील हे ७ घोटाळे उघड”