पुणे : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय नेत्यांनी आपापली तयारी सुरू केली आहे. यातच आता ठाकरे गटाकडून लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडे असलेल्या शिरूर मतदारसंघावर ठाकरे गटाने दावा सांगितला असून, या मतदारसंघात आता आम्हाला उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा…पुणे शहरात शरद पवार गटाच्या हालचाली सुरू, ‘मी शरद मित्र’ नावाखाली सदस्य नोंदणी
विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी या बाबत भाष्य केले आहे. शिरूरबद्दल कार्यकर्त्यांशी तशी भावना आहे. शिरूरमध्ये आम्ही याआधी लढलो होतो. लोकसभेत विद्यमान खासदार हे राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाचे आहेत. अमोल कोल्हे सध्या तिथले विद्यमान खासदार आहेत. परंतु तिथल्या आमच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आहेत. असं सचिन अहिर यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…“इंडिया आघाडीत ३० पक्ष एकत्र आले, तरीही आम्हाला काही फरक पडत नाही”
दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघात सध्या अमोल कोल्हे खासदार असून ते शरद पवार गटात आहेत. यातच आता गेल्या काही दिवसापासून शरद पवारांबद्दल जो संभ्रम निर्माण केला जात आहे.त्यावरून राजकीय गोंधळ निर्माण झाला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मोदींची स्थिती देवेंद्र फडणवीसांच्या मी पुन्हा येईन सारखी होईल”, शरद पवारांचा खोचक टोला
हेही वाचा…कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम, विरोधकांची टिका, अजित पवार भेट, शरद पवारांनी मांडली आपली भूमिका
हेही वाचा…कॅगकडून नरेंद्र मोदींच्या सरकारमधील हे ७ घोटाळे उघड”
हेही वाचा…“पुढचा स्वांतत्र्या दिनाचा सोहळा मोदी माजी पंतप्रधान म्हणून गुजरातच्या घरी पाहतील”
हेही वाचा…“मुंबई गोवा महामार्गावर १५६६६ हजार कोटी खर्च, आमदार काय करतात?” राज ठाकरेंचा सवाल