पुणे : राष्ट्रवादीत दोन गट पडल्याने आता पुणे शहरात शरद पवार गटाने आता जोरदार तयारी सुरू केली आहे. पुणे शहरात शरद पवार यांच्यासोबत आपण आहोत हे दाखवण्यासाठी कोथरूड विधानसभा मतदारसंघात मी शरद मित्र या नावाखाली सदस्य नोंदणी अभियान सूरू केला आहे. त्याची आजपासून सुरूवात देखील कार्यकर्त्यांनी केली आहे.
हेही वाचा…“सरकारमध्ये अस्वस्थता.., मुख्यमंत्र्यांने ठेवलं स्नेहभोजन, ‘या’ मंत्र्यांना दिलं आमंत्रण”
राष्ट्रवादी कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष स्वप्निल दुधाने यांनी या अभियानाची सुरूवात केली आहे. आज राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते या अभियानाची सुरूवात होणार आहे. या अभियानाच्या मार्फत पुणे शहरातील नक्की किती कार्यकर्ते हे शरद पवार यांच्यासोबत असल्याचे चित्र जळवपास स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा…“वॉशिंग मशीनच्या विरोधात आपल्याला लढायचं, घाबरण्याचं नाही”, सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला
दरम्यान, यातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गुप्त बैठक झाल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा होऊ लागली आहे. यावरून आता शरद पवारांनी निर्माण झालेला संभ्रम दुर करावा, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केली जात आहे. तर आता ठाकरे आणि काॅंग्रेसने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करून दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“इंडिया आघाडीत ३० पक्ष एकत्र आले, तरीही आम्हाला काही फरक पडत नाही”
हेही वाचा…शरद पवारांशिवाय निवडणुका लढवू ? उद्धव ठाकरेंकडून लोकसभा मतदारसंघाचा आढावा
हेही वाचा…मेधा कुलकर्णी अन् चंद्रकांत पाटलांमधील नाराजी देवेंद्र फडणवीस दूर करणार
हेही वाचा…“तर उद्या दाऊद इब्राहिम याने भाजपचे गुणगान गायले तर त्यालाही पक्षात घेईल”
हेही वाचा…राज्यात मोठी राजकीय डाळ शिजतेयं? कोण कोणासोबत? तर कोण कोणाच्या विरोधात ?