मुंबई : वॉशिंग मशीनच्या विरोधात आपल्याला लढायचं आहे. हल्ली सगळे व्हॉट्सअप आणि फेसबूक टाईमवरच बोलतात. याचं कारण नागरिकांना विचारलं तर ते म्हणतात सगळे कॉल रेकॉर्ड होतात. आपण देशाच्या विरोधात कुठलेही काम करत नाही. आपण देशासाठी काम करत आहेत, त्यामुळे आपण कुणालाही घाबरण्याचं काम नाही. जे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक जणांनी बलिदान दिले ते स्वातंत्र्य आम्ही कुणाच्याही दडपशाही खाली जाऊ देणार नाही. असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.
हेही वाचा…“अजित पवारांना मुख्यमंत्री केलं जाईल, असं मुळीच वाटत नाही”
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, दिड वर्ष झाली महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका झाल्या नाहीत. निवडणुका घ्या ही मागणी स्वातंत्र्यदिनानिमित्त करावी लागते हे दुर्दैवी आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न कुणी सोडवायचे ? नगरसेवक, ग्रामपंचायत, सदस्य जिल्हा परिषद सदस्य निवडून येतात. त्यावेळी सर्वसामान्यांचे प्रश्न प्रशासनासमोर मांडतात. मात्र गेल्या दीड वर्षांपासून सध्याच्या राज्य सरकारने निवडणुका घेतलेल्या नाही. या निवडणुका कोणत्या भीतीमुळे घेण्यात आल्या नाही का ? असा सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
हेही वाचा…“भाजपकडून आपल्याला ऑफर,परंतु..,” मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मोठं विधान
दरम्यान, तसेच लोकांमध्ये द्वेष वाढवण्याचं काम केलं जातं आहे. महागाई बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत आहे. पेट्रोल डिझेल दर आणखी वाढणार आहेत. याचा जाहीर निषेध करायला हवा. दडपशाही दिन साजरा करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी महागाई, बेरोजगारी, मणिपूर, महिला सुरक्षा यासारख्या आव्हानावर आज बोलावं लागत आहे. यासारखं दुर्दैवाची बाब आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षावर आज मोठी जबाबदारी आली असल्याचंही त्यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…कॉंग्रेसमध्ये धुसफूस आजी माजी आमदारांना कोणी विचारेना, पटोलें विरोधात नाराजीचा सूर
हेही वाचा…“अरे वेड्या त्या गाडीत नव्हतोच, तर उतरणार कसा ?”, अजित पवारांनी ‘तो’ दावा फेटाळला
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा, शिंदेंनी ‘दोन’ उपमुख्यमंत्र्यांपासून सावध राहावं”
हेही वाचा…“पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांना दोन मोठ्या ऑफर,” काॅंग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांचा दावा
हेही वाचा…शरद पवारांच्या भेटीची तक्रार काॅंग्रेसच्या हायकमांडकडे, राहुल गांधी चर्चा शरद पवारांसोबत चर्चा करणार