कोल्हापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात पुण्यात भेट झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर बाहेर पडतांना अजित पवार माध्यमांशी नजर चुकवत ते आपल्याच गाडीतून झोपून गेल्याचे काही व्हिडीओ समाज माध्यमांसमोर आलेत. त्यानंतर एकच चर्चा राजकीय वतुर्ळात रंगू लागली. यावर आता अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“नवाब मलिकांच्या बेलमध्ये आणखी वाढ होतांना दिसेल,” सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
स्वातंत्र्य दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण आज अजित पवार यांच्या हस्ते झाला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. उथळमाथ्याने फिरणारा कार्यकर्ता असून घरातून बाहेर पडतांना मी लपून गेलो नाही. त्यानंतरही पत्रकारांनी विचारले असता. त्यावर अजित पवार म्हणाले की, अरे वेड्या त्या गाडीत नव्हतोच, तर उतरणार कसा ? बैठकीला गेलो हे मान्य करतो, परंतु ज्या गाडीचा अपघात झाला, ती गाडी माझी नव्हतीच, त्या गाडीत मी नव्हतोच, असं अजित पवार यांनी म्हटलंय.
हेही वाचा…“संभ्रमाचं वातावरण निर्माण करण्याची भाजपची रणनिती”, दोन पवारांच्या भेटीवर रोहित पवारांची भाजपवर टिका
दरम्यान, ज्या उद्योगपतीच्या घरी भेट झाली, त्या चोरडियाच्या दोन पिढ्याचे आमचे संबंध आहेत. चोरडीयाचे वडिल पवार साहेबांचे क्लासमेट होते. पवार साहेब कार्यक्रम संपवून येणार होते. त्यानंतर जयंत पाटील आणि पवार साहेबांना चोरडीया यांनी जेवायला बोलावलं होतं. त्यानंतर मला देखील बोलवण्यात आले. त्यानंतर मी गेलो. परंतु काका पुतण्याने भेट घेतली, यात गैर काय ? असा सवाल देखील अजित पवार यांनी केला.
READ ALSO :
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा, शिंदेंनी ‘दोन’ उपमुख्यमंत्र्यांपासून सावध राहावं”
हेही वाचा…“पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांना दोन मोठ्या ऑफर,” काॅंग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांचा दावा
हेही वाचा…शरद पवारांच्या भेटीची तक्रार काॅंग्रेसच्या हायकमांडकडे, राहुल गांधी चर्चा शरद पवारांसोबत चर्चा करणार
हेही वाचा…“अजित पवारांना मुख्यमंत्री केलं जाईल, असं मुळीच वाटत नाही”
हेही वाचा…“भाजपकडून आपल्याला ऑफर,परंतु..,” मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मोठं विधान