पुणे : आगामी लोकसभा आणि विधानसभा, महानगरपालिकांच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला मनसेचे महत्वाचे नेते उपस्थित होते. तर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी तयार राहावे, असंही राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे. याचबरोबर त्यांनी भाजपच्या युतीसोबत मोठं विधान केलं आहे.
हेही वाचा…जामीन मंजूर, पण… कोर्टाकडून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांना ६ अटी
भाजपकडून आपल्याला ऑफर आहे, परंतु मी त्यावर अजून निर्णय घेतला नाही. एकनाथ शिंदे आणि नुकतेच युतीत सामील झालेले अजित पवार यांचे भाजप काय करणार? पुढचे गणित कसे जुळवणार? याची स्पष्टता नाही. त्यामुळे मी अजून निर्णय घेतला नाही. युतीबाबत तुम्ही चर्चा करू नका. सध्या पक्ष वाढवणे हे महत्वाचे असल्याचंही राज ठाकरे यांनी म्हटलंय.
हेही वाचा…“ती कृती भीष्म पितामहाकडून होता कामा नये,” ठाकरे गटाकडून शरद पवारांवर पहिल्यांदाच टिका
दरम्यान, सध्या महायुतीत भाजपसह एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादीचा गटाचा समावेश आहे. यातच आता मनसेला देखील महायुतीत समावून घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. परंतु यावर राज ठाकरे काय भूमिका घेणार ते पाहणं महत्वाचं आहे. यातच आता मुंबई महानगरपालिकांवर पुन्हा भगवा फडकवण्याचं ठाकरे गटाचं स्वप्न आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“नवाब मलिकांच्या बेलमध्ये आणखी वाढ होतांना दिसेल,” सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
हेही वाचा…“संभ्रमाचं वातावरण निर्माण करण्याची भाजपची रणनिती”, दोन पवारांच्या भेटीवर रोहित पवारांची भाजपवर टिका
हेही वाचा…“एकीकडे एकनिष्ठ आणि दुसरीकडे भ्रष्टाचारी लोक”, आदित्य ठाकरेंची जहरी टिका
हेही वाचा…“युडीसीपीआर कायद्यात शिथिलता आणि शनिवारवाडा परिसरातील बांधकामांना परवानगी द्या,” हेमंत रासनेंची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी
हेही वाचा…स्वच्छतेचा नमो करंडक स्पर्धेचा न्यूयॉर्कमध्ये डंका; टाइम्स स्क्वेअर बिल बोर्डवर झळकला 3 पर्वाच्या स्पर्धेचा लोगो