मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. या भेटीनंतर राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर अजित पवार-शरद पवार भेटीची माहिती काॅंग्रेसच्या हायकमांडला पोहचवली असल्याचं काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे आता ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…मोठी बातमी…!”निलंबित असलेल्या ‘या’ बड्या नेत्याला काॅंग्रेसमध्ये सन्मानाने घेतले जाणार”
या प्रकरणाबाबत विचारले असता, आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्ही मुखपत्रामध्ये आमची स्पष्ट भूमिका मांडली आहे. जे सामनामध्ये आलं आहे, ती पक्षाची भूमिका आहे. सध्याचं राज्यातलं राजकारण म्हणजे एका बाजूला एकनिष्ठ लोक आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना वॉशिंग मशीनमध्ये उडी मारायची आहे, असे नेते. एकीकडे एकनिष्ठ आणि दुसरीकडे भ्रष्टाचारी लोक, असं सध्याचं राजकारण असल्याचंही त्यांनी सांगितले.
हेही वाचा…मोठी बातमी..! “३०० पेक्षा अधिक संत महंत, कीर्तनकार, निरूपणकार व अध्यात्मिक क्षेत्रातील ‘या’ दिग्गजांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश”
दरम्यान, शरद पवार हे आमच्या सगळ्यांचे नेते आहेतच त्याचबरोबर ते महाविकास आघाडीचे नेते आहेत. ते इंडिया आघाडीचे नेते आहेत. सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत. मात्र एक संवादाची भूमिका असते. ती आम्ही करतो. राजकारणात त्या भूमिकांचा काय परिणाम होईल. असंही ठाकरेंनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“युडीसीपीआर कायद्यात शिथिलता आणि शनिवारवाडा परिसरातील बांधकामांना परवानगी द्या,” हेमंत रासनेंची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी
हेही वाचा…स्वच्छतेचा नमो करंडक स्पर्धेचा न्यूयॉर्कमध्ये डंका; टाइम्स स्क्वेअर बिल बोर्डवर झळकला 3 पर्वाच्या स्पर्धेचा लोगो
हेही वाचा…जामीन मंजूर, पण… कोर्टाकडून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांना ६ अटी
हेही वाचा…“ती कृती भीष्म पितामहाकडून होता कामा नये,” ठाकरे गटाकडून शरद पवारांवर पहिल्यांदाच टिका