अहमदनगर : राज्याच्या विधान परिषद निवडणुकीच्या वेळी निर्माण झालेल्या गोंधळात काॅंग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले डॉ. सुधीर तांबे यांना पुन्हा पक्षात घेतलं जाणार असल्याचं काॅंग्रेसचे नेते चंद्रकांत हंडोरे यांनी म्हटले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काॅंग्रेसच्या नेत्यांकडे महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
हेही वाचा…माझ्याकडे “ना मसल पॉवर, ना मनी पॉवर”, म्हणूनच.. चांदणी चौक लोकार्पण सोहळ्याला डावललं, मेधा कुलकर्णींची नाराजी
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना पक्षात घेतले जाईल. काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी डॉ. तांबे यांच्यावरील निलंबनाची केलेली कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी केली आहे. डॉ. तांबे यांच्या प्रभावी नेतृत्वाची पक्षाला गरज असून त्यांना लवकरच सन्मानाने पक्षात घेतले जाईल. असं चंद्रकांत हंडोरे यांनी म्हटले आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघ हा काॅंग्रेसकडेच घेणार असल्याचे काॅंग्रेस पक्षाचे शिर्डी लोकसभा निरीक्षक माजी चंद्रकांत हंडोरे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…मोठी बातमी…! माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांची राजकारणातून एक्झिट ?
दरम्यान, पुण्यासह बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात काॅंग्रेसची ताकद मोठी आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघांमधून काॅंग्रेसचे आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे काॅंग्रेसने बारामती आणि शिरूर लोकसभा स्वबळावर लढवण्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात असल्याची माहिती काॅंग्रेसचे बारामती-शिरूर लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक आमदार कुणाल पाटील यांनी रविवारी दिली.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी..! “३०० पेक्षा अधिक संत महंत, कीर्तनकार, निरूपणकार व अध्यात्मिक क्षेत्रातील ‘या’ दिग्गजांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश”
हेही वाचा…शरद पवार अजित पवार भेट..! “कुणावर हसावे व कुणावर चिडावे, हे महाराष्ट्राला कळेनासे झाले”
हेही वाचा…“उद्या तेच १ लाखाच्या मताधिक्याने पुन्हा निवडून येतील”, नाराज असलेल्या मेधा कुलकर्णींना खोचक टोला
हेही वाचा…काल नाराजी आज मेधा कुलकर्णी कार्यक्रमाच्या स्थळी, चांदणी चौक लोकार्पण सोहळा चर्चेत
हेही वाचा…“एखाद्या कार्यकर्त्याने पत्रकात आपला फोटो टाकला नाही,” मेधा कुलकर्णींच्या आरोपावर पुनीत जोशीचं ट्विट