पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात गुप्त भेट झाल्याने राज्यात सध्या एकच चर्चा सुरू आहे. त्यावरून आता विरोधी पक्षातील नेत्यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टिका केली आहे. तर शरद पवारांनी जनतेत निर्माण झालेला संभ्रम दूर करावा. अशी मागणी विरोधकांनी केला आहे. यातच आज सामानातून देखील याप्रकरणाबाबत निशाणा साधण्यात आला आहे.
हेही वाचा…राज्यसभेच्या त्या ९ खासदारांचा कार्यकाळ संपला, नवीन निवडणुका कधी ?
दोन पवारांची गंमतभेट व मुख्यमंत्र्यांचा वाढता आजार हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण महाराष्ट्र म्हणजे गमंत जंमत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवार यांच्या भेटीस वारंवार जात आहेत व शरद पवार या भेटी टाळत नाहीत हे गंमतीचे आहे. मुख्यमंत्रीपदावर डोळा आहे. राज्यातील सरकार हे गंमत जंमत सरकार आहे. नानांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत आहोत, पण त्यात थोडी भर टाकून सांगतो, पवार काका-पुतण्यांच्या अलीकडच्या भेटीचा प्रकारसुद्धा गंमत जंमत ठरत आहे. नक्की कुणावर हसावे व कुणावर चिडावे, हे महाराष्ट्राला कळेनासे झाले आहे. शरद पवार यांची प्रतिमा अशा भेटीने मलिन होते व ते बरे नाही. अस सामानातून टिका करण्यात आली आहे.
हेही वाचा…“राजकारणासाठी इडीच्या चौकशा लावल्या जातात, पण.,” अनिल देशमुखांची जोरदार टिका
अजित पवार यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह भाजपची वाट धरल्यावर सगळ्यात मोठी गंमत झाली ती एकनाथ शिंदे व त्यांच्या गटाची. आता तर शिंदे आजारी पडले असून त्यांची प्रकृती खूपच खालावली आहे व त्यांना जबरदस्तीने इस्पितळात दाखल करू, असे शिंदे यांचे समर्थक आमदार संजय शिरसाठ यांनी जाहीर केले. शिंदे हे २४ तास काम करतात म्हणून हे आजारी पडले, पण शिंदे २४ तास काम करतात ते महाराष्ट्रात कोठेच दृष्य स्वरूपात दिसत नाही. कधीही पद गमवावे लागेल या भीतीतून त्यांची झोप उडाली असेल तर त्यास २४ तास काम करणे असे म्हणता येत नाही. असंही सामानातून सांगण्यात आले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“उद्या तेच १ लाखाच्या मताधिक्याने पुन्हा निवडून येतील”, नाराज असलेल्या मेधा कुलकर्णींना खोचक टोला
हेही वाचा…काल नाराजी आज मेधा कुलकर्णी कार्यक्रमाच्या स्थळी, चांदणी चौक लोकार्पण सोहळा चर्चेत
हेही वाचा…“एखाद्या कार्यकर्त्याने पत्रकात आपला फोटो टाकला नाही,” मेधा कुलकर्णींच्या आरोपावर पुनीत जोशीचं ट्विट
हेही वाचा…माझ्याकडे “ना मसल पॉवर, ना मनी पॉवर”, म्हणूनच.. चांदणी चौक लोकार्पण सोहळ्याला डावललं, मेधा कुलकर्णींची नाराजी
हेही वाचा…मोठी बातमी…! माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांची राजकारणातून एक्झिट ?