पुणे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज पुण्यातील प्रसिद्ध चांदणी चौकाच्या नूतनीकरणाचे लोकार्पण होत आहे. परंतु त्याआधीच भाजपच्या माजी महिला आमदार मेधा कुलकर्णी यांनी भाजपच्या अंतर्गत राजकारणाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. चांदणी चौक पुलासाठी सातत्याने वरिष्ठांकडे पाठपुरावा केला. परंतु ऐनवेळी कार्यक्रमाला साधं निमंत्रण देखील दिलं नाही. असं म्हणत मेधा कुलकर्णी यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष आरोप केले आहेत. त्यावर आता मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात एक फेसबुक पोस्ट प्रंचड व्हायरल होत आहे.
हेही वाचा…“राजकारणासाठी इडीच्या चौकशा लावल्या जातात, पण.,” अनिल देशमुखांची जोरदार टिका
कुणाल तोंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरून मेधा कुलकर्णी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, सोशल आणि न्यूज मिडियामध्ये आज तर आपण खूपच चमकत आहात, आपले अभिनंदन… आपण फेसबुकच्या माध्यमातून अत्यंत काळजाला भिडणारी पोस्ट लिहून माध्यमांना खुराक दिलात.
तुम्ही स्वतःची गोष्ट सांगून पोस्ट संपवलीत, पण गोष्ट अर्धीच आहे. असं म्हणत त्यांनी मेधा कुलकर्णी यांच्यावर निशाणा साधला आहे. २०१४ च्या मोदी लाटेत तुम्ही निवडून आलात परंतु. तुम्ही काहीच कामे केली नाहीत. असंह त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“मोदी-शहांच्या कार्यक्रमाला डावललं, अन् चांदणी चौकाच्याही कार्यक्रमात,” भाजपच्या माजी महिला आमदार अंतर्गत राजकारणावर नाराज
दरम्यान, आपल्या पोस्ट्स मुळे माध्यमांना पालकमंत्री व कोथरूडचे आमदार, भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांना टार्गेट करून २ दिवस चर्चा करण्याचा खुराक मिळेल. पण उद्या तेच १ लाखाच्या मताधिक्याने पुन्हा निवडून येतील तेव्हा मात्र तुमची खूप कुचंबणा होईल. अशा फेसबुक पोस्ट्स लिहून आपण पक्षाचे आणि त्याहीपेक्षा जास्त स्वतःचे नुकसान करून घेत आहात. असाही इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा…“माझ्या सारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याचं प्रयत्न”, मेधा कुलकर्णींचे चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप
काल चांदणी चौकाच्या निमंत्रणावरून मेधा कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी याबाबत सविस्तर पोस्ट देखील लिहिली होती. परंतु आज मेधा कुलकर्णी कार्यक्रमाच्या स्थळी दाखल झाल्या आहेत. नाराजीवर पत्रकारांनी त्यांना विचारले असता. अगोदर आपण कार्यक्रमाचा आनंद घेऊ, अशी थोडक्यात प्रतिक्रिया दिली.
यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर थोडी नाराजी देखील दिसत होती.
READ ALSO :
हेही वाचा…काल नाराजी आज मेधा कुलकर्णी कार्यक्रमाच्या स्थळी, चांदणी चौक लोकार्पण सोहळा चर्चेत
हेही वाचा…“एखाद्या कार्यकर्त्याने पत्रकात आपला फोटो टाकला नाही,” मेधा कुलकर्णींच्या आरोपावर पुनीत जोशीचं ट्विट
हेही वाचा…माझ्याकडे “ना मसल पॉवर, ना मनी पॉवर”, म्हणूनच.. चांदणी चौक लोकार्पण सोहळ्याला डावललं, मेधा कुलकर्णींची नाराजी
हेही वाचा…मोठी बातमी…! माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांची राजकारणातून एक्झिट ?
हेही वाचा…राज्यसभेच्या त्या ९ खासदारांचा कार्यकाळ संपला, नवीन निवडणुका कधी ?