पुणे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज पुण्यातील प्रसिद्ध चांदणी चौकाच्या नूतनीकरणाचे लोकार्पण होत आहे. परंतु त्याआधीच भाजपच्या माजी महिला आमदार मेधा कुलकर्णी यांनी भाजपच्या अंतर्गत राजकारणाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. चांदणी चौक पुलासाठी सातत्याने वरिष्ठांकडे पाठपुरावा केला. परंतु ऐनवेळी कार्यक्रमाला साधं निमंत्रण देखील दिलं नाही. असं म्हणत मेधा कुलकर्णी यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष आरोप केले आहेत. परंतु आज मेधा कुलकर्णी कार्यक्रमाला उपस्थित आहेत.
हेही वाचा…“मोदी-शहांच्या कार्यक्रमाला डावललं, अन् चांदणी चौकाच्याही कार्यक्रमात,” भाजपच्या माजी महिला आमदार अंतर्गत राजकारणावर नाराज
काल चांदणी चौकाच्या निमंत्रणावरून मेधा कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी याबाबत सविस्तर पोस्ट देखील लिहिली होती. परंतु आज मेधा कुलकर्णी कार्यक्रमाच्या स्थळी दाखल झाल्या आहेत. नाराजीवर पत्रकारांनी त्यांना विचारले असता. अगोदर आपण कार्यक्रमाचा आनंद घेऊ, अशी थोडक्यात प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर थोडी नाराजी देखील दिसत होती.
हेही वाचा…“माझ्या सारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याचं प्रयत्न”, मेधा कुलकर्णींचे चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप
दरम्यान, चांदणी चौक पुलाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी नितीन गडकरी पुण्यात दाखल झाले आहेत. त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या कार्यक्रमासाठी पुण्यात आले आहेत. तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते कार्यक्रमासाठी दाखल झाले आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“एखाद्या कार्यकर्त्याने पत्रकात आपला फोटो टाकला नाही,” मेधा कुलकर्णींच्या आरोपावर पुनीत जोशीचं ट्विट
हेही वाचा…माझ्याकडे “ना मसल पॉवर, ना मनी पॉवर”, म्हणूनच.. चांदणी चौक लोकार्पण सोहळ्याला डावललं, मेधा कुलकर्णींची नाराजी
हेही वाचा…मोठी बातमी…! माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांची राजकारणातून एक्झिट ?
हेही वाचा…राज्यसभेच्या त्या ९ खासदारांचा कार्यकाळ संपला, नवीन निवडणुका कधी ?
हेही वाचा…“राजकारणासाठी इडीच्या चौकशा लावल्या जातात, पण.,” अनिल देशमुखांची जोरदार टिका