पुणे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज पुण्यातील प्रसिद्ध चांदणी चौकाच्या नूतनीकरणाचे लोकार्पण होत आहे. परंतु त्याआधीच भाजपच्या माजी महिला आमदार मेधा कुलकर्णी यांनी भाजपच्या अंतर्गत राजकारणाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. चांदणी चौक पुलासाठी सातत्याने वरिष्ठांकडे पाठपुरावा केला. परंतु ऐनवेळी कार्यक्रमाला साधं निमंत्रण देखील दिलं नाही. असं म्हणत मेधा कुलकर्णी यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष आरोप केले आहेत. तर या संपुर्ण प्रकरणाबाबत त्यांनी ट्विटवर सविस्तर लिहिलं देखील आहे. त्यावर आता पुनीत जोशी यांनी देखील त्यावर उत्तर दिलं आहे.
हेही वाचा…“माझ्या सारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याचं प्रयत्न”, मेधा कुलकर्णींचे चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप
मेधा कुलकर्णी यांनी चांदणी चौकबाबतच्या प्रकरणाबाबत कोथरूड विधानसभा प्रमुख पुनीत जोशी यांचे देखील व्हाट्सअप क्रिनशॉट टाकले आहे. चांदणी चौक लोकर्पण सोहळ्यासाठी पुनीत जोशी यांच्याकडून निमंत्रण देण्यात आलं, परंतु यामध्ये मेधा कुलकर्णी यांचा कुठेही समावेश करण्यात आला नाही. याबाबत मेधा कुलकर्णी यांनी दोन क्रिनशॉट देखील शेअर केले आहे.
हेही वाचा…“2024 च्या निवडणुकीचा पराभव मोदींना दिसू लागलाय”, विजय वडेट्टीवारांचा मोदींवर हल्लाबोल
मेधा कुलकर्णी यांनी शेअर केलेल्या ट्विटवर पुनीत जोशी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, शहरातल्या २४० अधिकृत होंर्डिंग्सवर आपला फोटो आहे. आजचा सर्व वृत्तपत्रातल्या निमंत्रणात आपला फोटो आहे. एखाद्या कार्यकर्त्याने पत्रकात आपला फोटो टाकला नाही हा त्याचा वैयक्तिक पसंतीचा विषय आहे. आपण चांदणी चौकाचे प्रस्थापित काम सुरू झाल्यावर त्याचा पाठपुरवठा केला हे कोण नाकारतंय. अस पुनीत जोशी यांनी म्हटलंय.
“Disappointed”
.
.#BJPKothrud #BjpPune pic.twitter.com/UEIV1lV40w— Dr. Medha Kulkarni (@Medha_kulkarni) August 11, 2023
शहरातल्या 240 अधिकृत होंर्डिंग्स वर आपला फोटो आहे..
आजचा सर्व वृत्तपत्रातल्या निमंत्रणात आपला फोटो आहे. एखाद्या कार्यकर्त्याने पत्रकात आपला फोटो टाकला नाही हा त्याचा वयक्तिक पसंतीचा विषय आहे.
आपण चांदणी चौकाचे प्रस्थावित काम सुरु झाल्यावर त्याचा पाठपुरवठा केला हे कोण नाकारतंय. https://t.co/tG0yNSrQjV— Punit Shrikant Joshi (@punitjoshi26) August 11, 2023
READ ALSO :
हेही वाचा…माझ्याकडे “ना मसल पॉवर, ना मनी पॉवर”, म्हणूनच.. चांदणी चौक लोकार्पण सोहळ्याला डावललं, मेधा कुलकर्णींची नाराजी
हेही वाचा…मोठी बातमी…! माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांची राजकारणातून एक्झिट ?
हेही वाचा…राज्यसभेच्या त्या ९ खासदारांचा कार्यकाळ संपला, नवीन निवडणुका कधी ?
हेही वाचा…“राजकारणासाठी इडीच्या चौकशा लावल्या जातात, पण.,” अनिल देशमुखांची जोरदार टिका
हेही वाचा…“मोदी-शहांच्या कार्यक्रमाला डावललं, अन् चांदणी चौकाच्याही कार्यक्रमात,” भाजपच्या माजी महिला आमदार अंतर्गत राजकारणावर नाराज