गोंदिया : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते पद रिक्त होते. त्यावर आता काॅंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली आहे. विजय वडेट्टीवार यांनी आता राज्यातील दौरे सुरू केले असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांशी संवाद, बैठका सत्र सुरू करण्यात आले आहेत.
हेही वाचा…“अजितदादा भाजपसोबत, सुळे भाजपविरोधात भांडतात, हा थोडा घोळच”
आज गोंदिया जिल्हा काॅंग्रेस कमेटी द्वारे आयोजित भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुक २०२४ च्या संदर्भात विजय वडेट्टीवार यांनी बैठक घेतली. या बैठकीत क्षेत्रातील समस्या, केंद्र व राज्य सरकार द्वारे दुर्लक्षित करण्यात आलेले प्रकल्प याबाबत काॅंग्रेस कार्यकर्त्यांकडून आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील काॅंग्रेस, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्यासाठी व पक्ष संघटन बळकट करण्यासाठी आजचा दौरा महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबत पदाधिकाऱ्यांसह चर्चा करून बूथ कमिट्या, आघाड्या यांची माहिती देखील त्यांनी जाणून घेतली.
हेही वाचा…पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी कोणत्या दादाला संधी, राष्ट्रवादी अन् भाजपमध्ये रस्सीखेच
दरम्यान, २०२४ लोकसभा निवडणुकीतील पराभव आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जवळ दिसू लागला आहे. स्वतःचे जहाज बुडत असल्याची त्यांना जाणीव झाली असून इतर राजकीय पक्ष फोडत आहे. मात्र त्यांनी कितीही तोडफोड केली तरी त्यांचा पराभव निश्चित आहे. काँग्रेस पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता हा २०२४ मध्ये पूर्ण ताकदीने इंडिया साठी काम करेल. बूथ पातळीवर कार्यकर्त्यांनी कसे काम करायला हवे, असं त्यांनी म्हटले. सदर बैठकीला जिल्हाध्यक्ष दिलीप बन्सोड, प्रदेश महासचिव नामदेव किरसान, पी.जी.कटरे, किसान काँग्रेसचे जितेश राणे, महिला जिल्हाध्यक्ष वंदना काळे, पदाधिकारी यांच्यासह गोंदिया जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ, युवा व महिला कार्यकर्ता उत्साहाने उपस्थित होते.
READ ALSO :
हेही वाचा…“..त्यामुळेच पंतप्रधानांना मणिपूरमधील आग विझवायची नाही”, राहुल गांंधींची मोदींवर टिका
हेही वाचा…शरद पवारांचा मुंबईचा वाघ आज अखेर बाहेर येणार, नवाब मलिकांना जामीन मंजूर
हेही वाचा…नवाब मलिकांना अखेर जामीन मंजूर, शरद पवार की अजित पवार गटात, चर्चांना उधाण
हेही वाचा…हुंडाईंची महाराष्ट्रात 5000 कोटींची गुंतवणुक, रोहित पवारांनी राज्य सराकराला दिला ‘हा’ सल्ला
हेही वाचा…“हवामान खराब, तरीही शिंदेंचा हॅलिकॉप्टरने प्रवास,” जितेंद्र आव्हाडांचा दावा, केली भावनिक पोस्ट