पुणे : राज्यातील महायुती सरकारमध्ये अजित पवार सहभागी झाल्याने भाजपसह शिंदे गटातील आमदारांना मोठी अडचण निर्माण झाली. राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने मंत्रीपदासाठी इच्छुक असलेले अनेक आमदारांची राष्ट्रवादीमुळे गोची झाली. याचसोबत आता अनेक जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू झाली आहे.
हेही वाचा…“दुसऱ्यांची राज्य म्हणजे शत्रू राज्य समजणारी भाजपची चाणक्यनिती”
भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे असलेल्या पुण्याच्या पालकमंत्री पदावरून देखील तिढा निर्माण झाला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने पुण्याचे पालकमंत्री पद राष्ट्रवादीला मिळणार अशी चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडी सरकार असतांना पुण्याचे पालकमंत्री पद अजित पवार यांच्याकडे देण्यात आलं होतं. त्यामुळे याही वेळेस पालकमंत्री पद अजित पवार गटाला मिळणार का ? याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा…“राहुल गांधींनी प्लाईंक किस दिला, स्मृती ईंराणींचा राहुल गांधींवर गंभीर आरोप”
दरम्यान, शिंदे गटातील आमदार भरत गोगावले मंत्रिपदासाठी गेले काही महिन्यापासून इच्छुक आहेत. या जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या आमदार अदिती तटकरे यांनी मंंत्रिपदाची शपथ घेतल्याने या जिल्ह्यातील पालकमंत्री पद राष्ट्रवादीला जाणार अशी चर्चा असतांना भरत गोगावलेंनी यावर दावा सांगितला आहे. तर दुसऱ्या बाजूला नाशि क जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून देखील मोठा पेच निर्माण होऊ शकतो.
READ ALSO :
हेही वाचा…“१५ दिवसांत तोडगा काढा, अथवा मंत्रालयात साप सोडू”, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
हेही वाचा…“..तर मोदींनी शरद पवारांना पंतप्रधान बनवावे”, काॅंग्रेसच्या बड्या नेत्याचं विधान
हेही वाचा…“१६ आमदार अपात्र होणारच, म्हणून विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा करताहेत”
हेही वाचा…“..तर मुख्यमंत्रीपदाची खुर्चीही हलू दिली नसती”, मोदींच्या ‘त्या’ विधानानंतर ठाकरे गटाच्या नेत्याची टिका
हेही वाचा…भाजपचा दुपट्टीपणा उघड…! राहुल गांधी संसदेत बोलत असतांना कॅमेरा हटवला