मुंबई : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मागील काही वर्षापासून तुरूंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिकांना अखेर कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. यातच राष्ट्रवादीच्या फुटीनंतर नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांनी अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज अखेर नवाब मलिकांना जामीन मंजूर झाला आहे.
हेही वाचा…“..तर मोदींनी शरद पवारांना पंतप्रधान बनवावे”, काॅंग्रेसच्या बड्या नेत्याचं विधान
नवाब मलिकांवर मनी लॉंड्रिंग केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना तुरूंगात डांबण्यात आलं. जामीन अर्जासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आला. परंतु त्यांचा प्रत्येक वेळी जामीन अर्ज फेटाळण्यात आला. आज अखेर त्यांना सुप्रिम कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. त्यांच्या प्रकृतीचा विचार करून दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर फेब्रुवारी २०२३ पासून मलिक जेलमध्ये जवळपास दीड वर्षापासून जामीन मेडिकल ग्राऊंडवर जामिनीसाठी ईडीचा विरोध नाही. असं सांगण्यात आलं.
हेही वाचा…“१६ आमदार अपात्र होणारच, म्हणून विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा करताहेत”
दरम्यान, अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले. अनेक कार्यकर्त्यांनी, आमदार, खासदारांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवार गटात सामील झालेत. त्यानंतर तुरूंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक कोणाकडे जाणार त्याची चर्चा सुरू होती. यातच आता त्यांना जामीन मंजुर झाला आहे. परंतु नवाब मलिक शरद पवारांसोबतच असल्याचं बोललं जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…हुंडाईंची महाराष्ट्रात 5000 कोटींची गुंतवणुक, रोहित पवारांनी राज्य सराकराला दिला ‘हा’ सल्ला
हेही वाचा…“हवामान खराब, तरीही शिंदेंचा हॅलिकॉप्टरने प्रवास,” जितेंद्र आव्हाडांचा दावा, केली भावनिक पोस्ट
हेही वाचा…“अजितदादा भाजपसोबत, सुळे भाजपविरोधात भांडतात, हा थोडा घोळच”
हेही वाचा…पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी कोणत्या दादाला संधी, राष्ट्रवादी अन् भाजपमध्ये रस्सीखेच
हेही वाचा…“१५ दिवसांत तोडगा काढा, अथवा मंत्रालयात साप सोडू”, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर