छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत छत्रपती संभाजीनगरमधील किर्तनकार, निरूपनकारांसह शेकडो उपासकांनी पालकमंत्री संदीपान भूमरे यांच्या उपस्थितत शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना धर्मवीर अद्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांच्या नेतृत्वामध्ये आज प्रवेश करण्यात आला आहे.
हेही वाचा…मोठी बातमी…! माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांची राजकारणातून एक्झिट ?
हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेबांच्या विचाराने भारावलेल्या तरुणांची फौज शिवसेनेत दाखल व्हायला लागली तसा संघटनेचा विस्तार झाला.आणि आता त्याच ठिकाणी औरंग्याच्या छाताडावर छत्रपती शिवाजीमहाराज व धर्मवीर संभाजीमहाराज की जय म्हणत शिवसेना अध्यात्मिक सेनेची पहिली शाखा संभाजीनगर येथे होत आहे याचे आत्मिक समाधान वाटते. याला स्वतः मुख्यमंत्री शिंदे साहेब व खासदार डॉ. श्रीकांतदादा शिंदे यांनी विशेष पाठबळ दिले आहे म्हणून आम्हाला अभिमानाने सांगावे वाटते की, आजच्या काळात हिंदुत्वाचे कैवारी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा एकमेव पर्याय महाराष्ट्रापुढे आहे. असं अक्षय महाराज भोसले यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…राज्यसभेच्या त्या ९ खासदारांचा कार्यकाळ संपला, नवीन निवडणुका कधी ?
दरम्यान, यावेळी रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री तथा पालकमंत्री संदिपान भुमरे , छत्रपती संभाजीनगर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना असे म्हटले की, प्रदेशाध्यक्ष श्री अक्षयमहाराज भोसलेंच्या नेतृत्वात अध्यात्मिक सेना आमच्या छत्रपती सांभाजीनगर येथे सक्रिय होत त्यांची प्रथम शाखा जिल्ह्यात सुरु झाली ही विशेष आनंदाची बाब आहे. अनेक संप्रदाय, धर्मगुरु, संत, महंत, भक्तीमार्ग यांना एका छताखाली आणून हिंदुत्वासाठी व समाजाच्या सेवेसाठी जोडण्याचे कार्य अभूतपूर्व आहे. मुख्यमंत्री श्रीएकनाथजी शिंदे यांचे या अध्यात्मिक सनेकडे विशेष लक्ष आहे.
हेही वाचा…“राजकारणासाठी इडीच्या चौकशा लावल्या जातात, पण.,” अनिल देशमुखांची जोरदार टिका
मुख्यमंत्री श्रीएकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना पक्षाच्यावतीने शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचा गाव तिथे शाखा अभियान प्रारंभ करण्यात आले आहे . हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आंनदजी दिघे यांचे हिंदुत्वाचे विचार घरोघरी पोहचविण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासुरगाव, जळगाव , राहेगाव भायगाव (गंगा ), खेडा , जवळी अशा या ठिकाणी शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना यांच्या शाखांचे उदघाटन आमच्या हस्ते करण्यात आले. अध्यात्मिक सेनेच्या मेळाव्यास संपूर्ण जिल्ह्यातून ३०० पेक्षा अधिक संत महंत, कीर्तनकार, निरूपणकार व अध्यात्मिक क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश होता. अध्यात्मिक क्षेत्रातील प्रत्येक घटकासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तत्पर आहेत, अनेक संतांचे वंशज नेतृत्वावर विश्वास ठेवत थेट प्रवेश करतात असा हा एकमेव शिवसेना पक्ष आहे. ज्यावर संतांची देखील विशेष कृपा आहे. असे मत संत एकनाथ महाराज यांचे वंशज पुष्करमहाराज गोसावी व मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी छत्रपती संभाजीनगर पालकमंत्री श्रीसंदीपान भुमरे, शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना कार्यकारणी सदस्य प्रभंजन महातोले, श्याम जामोदेकर शास्त्री व छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रमुख कडूबाळू महाराज गव्हादे व ९ तालुक्यातील कार्यकारणी सदस्य व आदी मान्यवर उपस्थित होते. असंही त्यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवार अजित पवार भेट..! “कुणावर हसावे व कुणावर चिडावे, हे महाराष्ट्राला कळेनासे झाले”
हेही वाचा…“उद्या तेच १ लाखाच्या मताधिक्याने पुन्हा निवडून येतील”, नाराज असलेल्या मेधा कुलकर्णींना खोचक टोला
हेही वाचा…काल नाराजी आज मेधा कुलकर्णी कार्यक्रमाच्या स्थळी, चांदणी चौक लोकार्पण सोहळा चर्चेत
हेही वाचा…“एखाद्या कार्यकर्त्याने पत्रकात आपला फोटो टाकला नाही,” मेधा कुलकर्णींच्या आरोपावर पुनीत जोशीचं ट्विट
हेही वाचा…माझ्याकडे “ना मसल पॉवर, ना मनी पॉवर”, म्हणूनच.. चांदणी चौक लोकार्पण सोहळ्याला डावललं, मेधा कुलकर्णींची नाराजी