पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची गुप्त बैठक झाल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. त्यानंतर आता राज्यातील राजकीय नेत्यांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर शरद पवारांनी या सर्व प्रकरणावर कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दुर करावा, अशी भूमिका महाविकास आघाडीतील नेत्यांनी घेतली आहे. यातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…काल नाराजी आज मेधा कुलकर्णी कार्यक्रमाच्या स्थळी, चांदणी चौक लोकार्पण सोहळा चर्चेत
तुम्ही नातीगोती जपायची आणि कार्यकर्त्यांनी मारामारी करायची का ? आमचेही राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याशी संबंध आहेत. मग आम्हीही त्यांच्यासोबत चहा पित बसलो तर चालेल का ? हे आमच्या डीएनएत नाही, असं सांगतानाच ती कृती भीष्म पितामहाकडून होता कामा नये, असा थेट इशाराच संजय राऊतांनी शरद पवार यांना दिला आहे.
हेही वाचा…“एखाद्या कार्यकर्त्याने पत्रकात आपला फोटो टाकला नाही,” मेधा कुलकर्णींच्या आरोपावर पुनीत जोशीचं ट्विट
दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांचे बंधू जयसिंगराव पाटील यांना अलिकडेच ईडीने नोटीस पाठवली आहे. माझ्या भावाला चार दिवसांपुर्वीच नोटीस आली होती. ईडीने त्यांच्याकडून काही माहिती मागितली होती. ती माहिती त्यांनी दिली. शनिवारी शरद पवार आणि अजित पवार यांच्या बैठकीत इडीच्या नोटीसीवर कोणतीही चर्चा झाली नसल्याचं जयंत पाटलांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“जयंत पाटलांना ईडीचा धाक दाखवून सोबत घेण्याचा भाजपचा प्रयत्न,” शरद पवारांचा गंभीर आरोप
हेही वाचा…मोठी बातमी…!”निलंबित असलेल्या ‘या’ बड्या नेत्याला काॅंग्रेसमध्ये सन्मानाने घेतले जाणार”
हेही वाचा…मोठी बातमी..! “३०० पेक्षा अधिक संत महंत, कीर्तनकार, निरूपणकार व अध्यात्मिक क्षेत्रातील ‘या’ दिग्गजांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश”
हेही वाचा…शरद पवार अजित पवार भेट..! “कुणावर हसावे व कुणावर चिडावे, हे महाराष्ट्राला कळेनासे झाले”
हेही वाचा…“उद्या तेच १ लाखाच्या मताधिक्याने पुन्हा निवडून येतील”, नाराज असलेल्या मेधा कुलकर्णींना खोचक टोला