मुंबई : मनी लॉंड्रिंगप्रकरणात तब्बल दीड वर्षानंतर जामीन मिळालेल्या राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांना ६ अटींच्या शर्ती कोर्टाने घातल्या आहेत. शुक्रवारी नवाब मलिक यांना सुप्रिम कोर्टाने २ महिन्यासाठी जामीन मंजूर केला आहे. आज नवाब मलिक तुरूंगातून बाहेर पडणार असून ते रूग्णालयातून थेट घरी जाणार आहेत. परंतु नवाब मलिकांना कोर्टाच्या ६ अटी मानाव्या लागणार आहेत.
हेही वाचा…“उद्या तेच १ लाखाच्या मताधिक्याने पुन्हा निवडून येतील”, नाराज असलेल्या मेधा कुलकर्णींना खोचक टोला
मनी लॉंर्डिंग आणि दहशतवादी दाऊदच्या जामीनीबाबत व्यवहार केल्याप्रकरणी नवाब मलिकांवर ईडीने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर नवाब मलिकांना अटक करण्यात आली होती. यातच आता मलिकांना कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला असून त्यांना आरोग्यासाठी दोन महिन्याचा जामीन मंजूर झाला आहे.
हेही वाचा…काल नाराजी आज मेधा कुलकर्णी कार्यक्रमाच्या स्थळी, चांदणी चौक लोकार्पण सोहळा चर्चेत
दरम्यान, नवाब मलिकांना ५० हजार रूपयांचा जामीन द्यावा लागणार आहे. तसेच याप्रकरणातील कोणत्याही साक्षीदाराला धमकावू नये, अशी अट कोर्टाकडून घालण्यात आली आहे. त्याचबरोबर नवाब मलिकांना आपल्या घराचा पत्ता तसेच मोबाईल नंबर द्यावा लागणार आहे. तसेच परदेशात जाण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली असून त्यांना पासपोर्ट देखील जमा करावा लागणार आहे. तसेच मीडीयाशी बोलू नये, गुन्हेगारी कृत्यात भाग घेऊ नये. अशा अटी ही घालण्यात आल्या आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“ती कृती भीष्म पितामहाकडून होता कामा नये,” ठाकरे गटाकडून शरद पवारांवर पहिल्यांदाच टिका
हेही वाचा…“जयंत पाटलांना ईडीचा धाक दाखवून सोबत घेण्याचा भाजपचा प्रयत्न,” शरद पवारांचा गंभीर आरोप
हेही वाचा…मोठी बातमी…!”निलंबित असलेल्या ‘या’ बड्या नेत्याला काॅंग्रेसमध्ये सन्मानाने घेतले जाणार”
हेही वाचा…मोठी बातमी..! “३०० पेक्षा अधिक संत महंत, कीर्तनकार, निरूपणकार व अध्यात्मिक क्षेत्रातील ‘या’ दिग्गजांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश”
हेही वाचा…शरद पवार अजित पवार भेट..! “कुणावर हसावे व कुणावर चिडावे, हे महाराष्ट्राला कळेनासे झाले”