पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची गुप्त बैठक झाल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. त्यानंतर आता राज्यातील राजकीय नेत्यांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर शरद पवारांनी या सर्व प्रकरणावर कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दुर करावा, अशी भूमिका महाविकास आघाडीतील नेत्यांनी घेतली आहे. यातच आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“जयंत पाटलांना ईडीचा धाक दाखवून सोबत घेण्याचा भाजपचा प्रयत्न,” शरद पवारांचा गंभीर आरोप
मला असं वाटतं की, ही सगळी भाजपची रणनिती आहे, हे जे संभ्रमाचं वातावरण आहे, ते सातत्याने राहिलं पाहिजे, असं त्यांना वाटतं. जेणेकरून भाजपला त्याचा फायदा होईल. त्यामुळे ही कदाचित भाजपाचीच करणी असावी. हे लोक मुद्दाम अशी चर्चा सातत्याने घडवून आणत आहेत. अस रोहित पवारांनी म्हटलंय.
हेही वाचा…मोठी बातमी…!”निलंबित असलेल्या ‘या’ बड्या नेत्याला काॅंग्रेसमध्ये सन्मानाने घेतले जाणार”
दरम्यान, तुम्ही नातीगोती जपायची आणि कार्यकर्त्यांनी मारामारी करायची का ? आमचेही राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याशी संबंध आहेत. मग आम्हीही त्यांच्यासोबत चहा पित बसलो तर चालेल का ? हे आमच्या डीएनएत नाही, असं सांगतानाच ती कृती भीष्म पितामहाकडून होता कामा नये, असा थेट इशाराच संजय राऊतांनी शरद पवार यांना दिला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“एकीकडे एकनिष्ठ आणि दुसरीकडे भ्रष्टाचारी लोक”, आदित्य ठाकरेंची जहरी टिका
हेही वाचा…“युडीसीपीआर कायद्यात शिथिलता आणि शनिवारवाडा परिसरातील बांधकामांना परवानगी द्या,” हेमंत रासनेंची देवेंद्र फडणवीसांकडे मागणी
हेही वाचा…स्वच्छतेचा नमो करंडक स्पर्धेचा न्यूयॉर्कमध्ये डंका; टाइम्स स्क्वेअर बिल बोर्डवर झळकला 3 पर्वाच्या स्पर्धेचा लोगो
हेही वाचा…जामीन मंजूर, पण… कोर्टाकडून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांना ६ अटी
हेही वाचा…“ती कृती भीष्म पितामहाकडून होता कामा नये,” ठाकरे गटाकडून शरद पवारांवर पहिल्यांदाच टिका