मुंबई : मनी लॉंड्रिंग प्रकरणात जामीनावर बाहेर आलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिकांना भेटण्यासाठी आता नेत्यांची रांग लागली आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार आणि शरद पवार गटातील नेत्यांनी नवाब मलिक यांची भेट घेतली आहे. यातच नवाब मलिक कोणत्या गटात जाणार ? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा, शिंदेंनी ‘दोन’ उपमुख्यमंत्र्यांपासून सावध राहावं”
अजित पवार गटातील प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि रूपाली चाकणकर यांनी काल नवाब मलिक यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्याआधी काॅंग्रेससह इतर नेत्यांनी देखील नवाब मलिकांची भेटी घेतली तर शरद पवारांनी फोनद्वारे नवाब मलिकांच्या तब्येतीची चौकशी केली. यावरून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना हे महायुतीत आले तरी भाजपला चालेल इतकेच नाही तर उद्या दाऊद इब्राहिम याने भाजपचे गुणगान गायले तर त्याला भाजप सुद्धा पक्षात घेईल. असा खोचक टोला विजय वडेट्टीवार यांनी भाजपला लगावला.
हेही वाचा…“पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांना दोन मोठ्या ऑफर,” काॅंग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांचा दावा
दरम्यान, भाजपला सत्तेसाठी सगळंच खपते. सत्तेसाठी भाजप सगळंच खपून घेणारी आहे. ते देशाला समर्पित नसून भाजप हे सत्तेला समर्पित आहे. ज्यांच्या सत्तर हजार कोटी भ्रष्टाचाराचा आरोप लावला. त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसलेले आहे. त्यांना काही फरक पडणार नाही. त्यांच्यासोबत देशद्रोही भिडे हा आहेच. संभाजी भिडे हा पोलिसांच्या गराड्यात फिरतो, त्याची रस्त्यावर उभे राहायची ताकद नाही हे सगळं भाजपमुळे पुरस्कृत आहे. असंही त्यांनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा…राज्यात मोठी राजकीय डाळ शिजतेयं? कोण कोणासोबत? तर कोण कोणाच्या विरोधात ?
हेही वाचा…“सरकारमध्ये अस्वस्थता.., मुख्यमंत्र्यांने ठेवलं स्नेहभोजन, ‘या’ मंत्र्यांना दिलं आमंत्रण”
हेही वाचा…“वॉशिंग मशीनच्या विरोधात आपल्याला लढायचं, घाबरण्याचं नाही”, सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला
हेही वाचा…कॉंग्रेसमध्ये धुसफूस आजी माजी आमदारांना कोणी विचारेना, पटोलें विरोधात नाराजीचा सूर
हेही वाचा…“अरे वेड्या त्या गाडीत नव्हतोच, तर उतरणार कसा ?”, अजित पवारांनी ‘तो’ दावा फेटाळला