पुणे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज पुण्यातील प्रसिद्ध चांदणी चौकाच्या नूतनीकरणाचे लोकार्पण झालं. त्याआधीच भाजपच्या माजी महिला आमदार मेधा कुलकर्णी यांनी भाजपच्या अंतर्गत राजकारणाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. चांदणी चौक पुलासाठी सातत्याने वरिष्ठांकडे पाठपुरावा केला. परंतु ऐनवेळी कार्यक्रमाला साधं निमंत्रण देखील दिलं नाही. असं म्हणत मेधा कुलकर्णी यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष आरोप केले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मेधा कुलकर्णींना व्यासपीठावर स्थान दिलं. परंतु पुण्यातील भाजपमधील अतंर्गत वाद अजूनही संपुष्ठात आला नाही. यातच आता भाजपचा बडा नेता यामध्ये मध्यस्थी करणार आहे.
हेही वाचा…“अरे वेड्या त्या गाडीत नव्हतोच, तर उतरणार कसा ?”, अजित पवारांनी ‘तो’ दावा फेटाळला
मेधा कुलकर्णी यांनी यांनी चांदणी चौकाच्या नुतनीकरणाच्या कार्यक्रमाच्या अगोदर फेसबुक पोस्ट करून नाराजी व्यक्त केली. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मेधा कुलकर्णी यांच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढली. यासंदर्भात कुलकर्णी यांनी त्याबाबतही लिहिलं होतं. यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या दोन दिवसात बैठक घेऊन मेधा कुलकर्णी आणि पुण्यातील भाजपमधील अतंर्गत वादावर पडदा टाकणार आहेत.
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा, शिंदेंनी ‘दोन’ उपमुख्यमंत्र्यांपासून सावध राहावं”
दरम्यान, चांदणी चौक पुलाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी नितीन गडकरी पुण्यात दाखल झाले. त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते.
READ ALSO :
हेही वाचा…“तर उद्या दाऊद इब्राहिम याने भाजपचे गुणगान गायले तर त्यालाही पक्षात घेईल”
हेही वाचा…राज्यात मोठी राजकीय डाळ शिजतेयं? कोण कोणासोबत? तर कोण कोणाच्या विरोधात ?
हेही वाचा…“सरकारमध्ये अस्वस्थता.., मुख्यमंत्र्यांने ठेवलं स्नेहभोजन, ‘या’ मंत्र्यांना दिलं आमंत्रण”
हेही वाचा…“वॉशिंग मशीनच्या विरोधात आपल्याला लढायचं, घाबरण्याचं नाही”, सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला
हेही वाचा…कॉंग्रेसमध्ये धुसफूस आजी माजी आमदारांना कोणी विचारेना, पटोलें विरोधात नाराजीचा सूर