सुशांतसिंह राजपूतच्या बहिणी प्रियांका सिंह आणि मितू सिंह यांच्याविरुद्ध तक्रारीच्या आधारेच एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे हा एफआयआर दाखल करून सीबीआयच्या तपासात आडकाठी आणण्याचा प्रयत्न झाला असे जे म्हणणे आहे ते निरर्थक आहे, असे मुंबई पोलिसांनी मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्रावर सांगितले आहे.
आता यावरून भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी एक धक्कादायक विधान केले आहे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पोलिसांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश देऊन सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करण्यासाठी बेस तयार केला, असा दावा निलेश राणे यांनी केला आहे.
निलेश राणे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मुंबई पोलिसांना प्रतिज्ञापत्र द्यायला लावून पवार साहेबांनी नुस्त सीबीआयला (CBI) डिवचलं नाही तर ह्या २ एजन्सी आपसात भिडले की शिवसेना टेन्शन मध्ये येईल त्यांना माहीत आहे. सुळेना मुख्यमंत्री करण्यासाठी बेस तयार केला जात आहे, असे खळबळजनक विधान राणे यांनी केले आहे.
मुंबई पोलिसांना प्रतिज्ञापत्र द्यायला लावून पवार साहेबांनी नुस्त CBI ला डिवचलं नाही तर ह्या २ एजन्सी आपसात भिडले की शिवसेना टेन्शन मध्ये येईल त्यांना माहीत आहे. सुळेना मुख्यमंत्री करण्यासाठी बेस तयार केला जात आहे.
मुंबई पोलिसांचं महत्त्वाचं प्रतिज्ञापत्र https://t.co/4NhW9yD1bA
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 3, 2020