पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा 3 वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाला असल्याने त्यांची बदली होणार अशी चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू होती. मात्र हर्डीकर यांना त्याच पदावर बढती मिळाल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. हर्डीकरांना बढती मिळाल्याने ते आयुक्तपदी कायम राहणार आहेत.
राज्य सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव (सेवा) सुजाता सौनिक यांनी त्याबद्दलचे पत्र आयुक्त हर्डीकर यांनी आज दिले. १ जानेवारी 2021 पासून सद्याच्याच पदावर स्थानापन्न पदोन्नती देण्यात आली आहे.
हर्डीकर यांनी 27 एप्रिल 2017 ला महापालिका आयुक्तपदाची सुत्र होती घेतली होती. त्यांचा 3 वर्षांचा कार्यकाल एप्रिल महिन्यातच पुर्ण झाला. मात्र कोरोना व्हायरसच महामारीच्या संकटात त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती.
गेली 8 महिने कोरोना काळात करण्यात आलेल्या त्यांच्या कामाचे देखील कौतुक होत आहे. त्यांच्या या कामामुळेच त्यांना बढती देण्यात आल्याची सध्या चर्चा आहे.