पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरणात पोलिसांनी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्या घरावर छापे टाकले आहेत.
शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे रिझर्व्ह बँकेने 2018-19 चे ऑडीट करण्याचे आदेश दिले होते. त्यात 71 कोटी 78 लाख रुपये कमी आढळले होते. त्यानंतर या बॅंकेचं संचालक मंडळ बरखास्त करुन संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी आमदार अनिल भोसले यांच्यावर अपहार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते.
तसेच पोलिसांनी त्यांच्या दोन आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या. तब्बल 72 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या अपहारप्रकरणी आमदार भोसलेंवर गुन्हे दाखल झाले आहेत.याप्रकरणी आणखी काही जणांवर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यात पुणे जिल्हा परिषदेच्या माजी पदाधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचं बोललं जात आहे.
Read Also :
अनुराग कश्यपच्या अडचणी वाढणार ! पायल घोष आणि रामदास आठवले यांनी घेतली राज्यपालांची भेटhttps://t.co/q0k5qlLwYh#PayalGhosh #RamdasAthavale #AnuragKashyap #bhagatsinghkoshyari
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 29, 2020