नाशिक : राज्यात सध्या मराठा आरक्षणासाठी वातावरण चांगलेच ढवळून निघाल आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात ठिकाणी मराठा कार्यकर्ते आक्रमक होताना पाहायला मिळतात. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा कार्यकर्ते आक्रमक झालेत. संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्याविरोधात मोठमोठ्याने याठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार नाशिकच्या दौऱ्यावर असतांना मराठा कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
शरद पवारांवरील टीकेचा निलेश लंकेनी घेतला समाचार; पडळकरांना म्हणाले…
उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात आंदोलन करणाऱ्या मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी या वेळी ताब्यात घेत अटक केली आहे. मराठा कार्यकर्ते अजित पवारांच्या ताफ्याला अडवण्याचा प्रयत्न करणार होते. मात्र पोलिसांनी ताफा येण्यापूर्वीच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. तर मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार जाणून बुजून वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केलाय.
केंद्रीय मंत्रीमंडळात देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागण्याची शक्यता?
गेल्या काही दिवसांपूर्वी बीडमध्येही वैद्यकीय सेवा देणाऱ्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी अजित पवार यांची गाडी अडवली होती. गाडी समोर झोपण्याचा प्रयत्न या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला. यावेळी पोलिसांनी या कर्मचाऱ्यांवर लाठीमारही केला होता. आक्रमक कर्मचाऱ्यांनी थेट अजित पवार यांच्या गाडी समोर उडी घेतली. कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत घ्या अशी मागणी या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केली होती.
Read Also :
- केंद्राला काय करायचं ते करू द्या, शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागू देणार नाही
- डॉ. अमोल कोल्हे म्हणजे माजी खासदाराच्या माळेचा मणी; जुन्नर मधील शेतकऱ्यांच्या प्रतिक्रीया
- शरद पवारांवरील टीकेचा निलेश लंकेनी घेतला समाचार; पडळकरांना म्हणाले…
- विधानसभेच्या अध्यक्षपद निवडीवरुन महाविकास आघाडीत संभ्रम कायम?
- विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आवाजी मतदान घेण्याचे संकते – संजय राऊत