पुणे : महाराष्ट्रासह देशभरा लसीकरण मोहिम सुरू आहे. मात्र लसींचा तुटवडा जाणवू लागल्याने लसीकरण मोहिम मंदावली आहे. ठाकरे सरकारकडून सातत्याने केंद्र सरकारकडून लसीचा पुरवठा करण्याची मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लसउत्पादक कंपनी ‘भारत बायोटेक’च्या प्लॅन्टसाठी पुण्यात तातडीने जागा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती दिली आहे.
दौंड उपजिल्हा रुग्णालयाच्या विस्तारित समर्पित कोविड सेंटरचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहातून ऑनलाईन पद्धतीने केले. त्यावेळी ते बोलत होते.
दौंड उपजिल्हा रुग्णालयाच्या विस्तारीत डेडिकेटेड कोविड सेंटरचं उद्घाटन ऑनलाईन पद्धतीनं केलं. यावेळी लसउत्पादक 'भारत बायोटेक'च्या प्लॅन्टसाठी पुण्यात तातडीनं जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. ते काम तातडीनं मार्गी लागेल,हे स्पष्ट केलं. pic.twitter.com/pSOFqnyRX8
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) May 11, 2021
कोरोनाला हरविण्यासाठी राज्यातील प्रत्येक नागरिकाला लस देण्याची सरकारची भूमिका आहे. त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे. लसउत्पादक ‘भारत बायोटेक’च्या प्लॅन्टसाठी पुण्यात तातडीने जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती अजित पवारांनी दिली.
कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगाने पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. लसीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध आहे. भारत बायोटेक कंपनीच्या प्लॅन्टला पुण्यात जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार नियोजन सुरु आहे. ते कामही तातडीने मार्गी लागेल, असे ते म्हणाले.
Read Also :