मुंबई : एकीकडे प्रवेशाचा गोंधळ टाळण्यासाठी महाविकास आघाडीची समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला असतानाच शिवसेनेला काँग्रेसने एकामागून एक असे दोन धक्के दिले आहेत. ठाण्यातील शिवसेना नेते सुरेश (बाळा मामा) म्हात्रे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत म्हात्रे मुंबईत काँग्रेसचा झेंडा हाती धरतील. शिवसेना-मनसे-भाजप-शिवसेना त्यानंतर आता काँग्रेस असा सुरेश म्हात्रेंचा राजकीय प्रवास आहे.
विधान परिषद १२ आमदार नियुक्तीचा पेच कायम : राज्यपालांनी ८ महिने उलटूनही निर्णय घेतला नाही
सुरेश गोपीनाथ म्हात्रे हे बाळ्या मामा नावाने प्रसिद्ध आहेत. शिवसेनेचे ठाणे ग्रामीण जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. ठाणे जिल्हा परिषदेचे गटनेते, तर बांधकाम, आरोग्य समितीचे सभापती देखिल ते राहिले आहे. २०१४ मध्ये म्हात्रेंनी मनसेकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. पराभवानंतर आधी भाजप, नंतर पुन्हा स्वगृही शिवसेनेत प्रवेश केला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार कपिल पाटील यांना उघड विरोध करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
आपत्ती निवारणासाठी प्राथमिकता ठरवून नियोजन करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
अर्ज मागे घेत कपिल पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे शिवसेनेतून निलंबित करण्यात आले, नंतर निलंबन मागे घेण्यात आले. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडल्यापासून नाना पटोले यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा एल्गार केल्यापासूनच पटोलेंच्या नेतृत्वात अनेक नेत्यांचे पक्षप्रवेश होऊ लागले आहेत.
नितेश राणे यांच्याकडे जी प्रगल्भता, ती दुर्दैवाने शिवसेनेकडे नाही – आशिष शेलार
शिवसेना उपनेते अशोक शिंदेही काँग्रेसमध्ये
दुसरीकडे, शिवसेनेचे उपनेते आणि माजी राज्यमंत्री अशोक शिंदेही काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. ते वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. शिवसेनेचे वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख आणि माजी खासदार अनंत गुढे आणि अशोक शिंदे यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. अशोक शिंदे यांनी मुंबईला जाऊन शिवसेना पक्षनेतृत्वाकडेही गुढे प्रकरणात न्याय मागितला होता, परंतु सेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांची दखल घेतली नसल्याचं बोललं जातं. त्यानंत अशोक शिंदेंनी शिवबंधन सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय निश्चित केला आहे.
Read Also :
- महाविकास आघाडीच्या नाटकीपणापासून आत्ताच सावध व्हा; खासदार सुजय विखेंचे जनतेला आवाहन
- मोदी सरकार लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याच्या तयारीत; ६ ऑगस्टला राज्यसभेत होणार चर्चा!
- कोरोना थोतांड, वारकऱ्यांनो रस्त्यावर उतरा, मंदिराची कुलुपे तोडा – संभाजी भिडे
- मोठी बातमी: संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरू होणार!
- एकनाथ खडसे कधी सीडी लावताहेत याची वाट पाहतोय – राज ठाकरे