पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पुण्यात पक्षाच्या नव्या कार्यालयाचे उद्धाटन केले. राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अनेक विषयांवर भाष्य केलं. एकनाथ खडसे केव्हा सीडी लावताहेत याची वाट पाहतोय, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी यावेळी केली.
जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे; रामदास आठवलेंची मोठी मागणी
नवनिर्वाचित केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता, पण त्यांचा फोन लागला नाही, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं. त्यांचा आणि त्यांच्या मुलाचाही फोन लागला नाही, असं ते म्हणाले. भाजप नेते नारायण राणे यांना केंद्रात मोठी जबाबदारी देण्यात आली असून त्यांच्याकडे सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय देण्यात आलं आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषद: पुत्रप्रेम जिंकणार की, एक कार्यकर्ता अध्यक्ष होणार?
भाजप नेते नारायण राणे यांची केंद्र सरकारमध्ये मंत्री म्हणून वर्णी लागली. यावेळी त्यांना पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या का? असा सवाल केला होता. यावर बोलताना नारायण राणे म्हणाले होते की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मला फोन करुन शुभेच्छा दिल्या, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या नाहीत. शुभेच्छा देण्याइतकं त्यांचं मन मोठं नाही. याच मुद्द्यावरुन राज ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांनी सांगितलं की, मी नारायण राणे यांना शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता, पण त्यांचा फोन लागला नाही. दोन-तीन दिवसांत फोन लागल्यास मी शुभेच्छा देईन, असेही त्यांनी सांगितले.
Read Also :
- ‘नॉट रिचेबल’ असणाऱ्या नारायण राणेंचा अखेर फोन लागला; राज ठाकरेंनी मंत्रिपदासाठी दिल्या शुभेच्छा
- तांदूळ घोटाळ्याचे धागेदोरे वरपर्यंत; फडणवीसांचा गंभीर आरोप
- “सत्तेत काँग्रेसला कुणी विचारत नाही आणि काँग्रेसमध्ये नाना पटोलेंना!”
- संजय राठोड यांचं होणार पुनर्वसन? मंत्री मंडळातल्या प्रवेशाबद्दल म्हणाले…
- शिवसेनेकडून ऑफर? उज्ज्वल निकम यांनी दिली प्रतिक्रीया