मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासाठी ‘नॉट रिचेबल’ असणाऱ्या नारायण राणे यांचा फोन अखेर लागला आहे. राज ठाकरे यांनी फोनवरून नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपदासाठी शुभेच्छा दिल्या. सोमवारी सकाळी या दोन्ही नेत्यांमध्ये फोनवरुन चर्चा झाली. मात्र, याशिवाय दोन्ही नेत्यांमध्ये कोणतीही राजकीय स्वरुपाची चर्चा झाली का, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.
हे पण वाचा: कोकणात शिवसेना-भाजप नेते एकाच व्यासपीठावर; विनायक राऊतांनी थोपटली नितेश राणेंची पाठ
हे पण वाचा: जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे; रामदास आठवलेंची मोठी मागणी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी पुण्यात पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन केले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी राज यांना तुम्ही नारायण राणे यांना शुभेच्छा दिल्यात का, असा प्रश्न विचारला होता. त्यावर राज ठाकरे यांनी माझा नारायण राणे यांच्याशी अद्याप संपर्क झालेला नाही, असे म्हटले होते. नारायण राणे यांना मी फोन केला होता. त्यांचे दोन्ही फोन आणि त्यांच्या मुलांचे फोन बंद होते. उद्या परवा नारायण राणे यांच्यासोबत बोलणं होईल, असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर आज लगेचच राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात फोनवरुन चर्चा झाली.
हे पण वाचा: “महाविकास आघाडी सरकार त्याचा कार्यकाळ पूर्ण करील’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याचे वक्तव्य
हे पण वाचा: ‘‘टप्प्यात आलेल्या भाजपचा महाविकास आघाडी सरकारकडून करेक्ट कार्यक्रम’’
कोकणात शिवसेना-भाजप नेते एकाच व्यासपीठावर
कोकणात शिवसेना आणि राणे कुटुंबीयांमध्ये होणारे राडे ही काही नवी बाब नाही. सेना आणि राणे यांच्यातील राजकीय कलगीतुरा नेहमी रंगलेला असतो. पण रविवारी सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथे एक वेगळंच पहायला मिळालं. वेंगुर्ले नगरपरिषदेच्या वेंगुर्ले सागररत्न मत्य बाजारपेठे लोकार्पणाच्या निमित्ताने विनायक राऊत आणि नितेश राणे एकत्र येताना दिसले.
विनायक राऊतांनी थोपटली नितेश राणेंची पाठ
नितेश राणे हे भाषण संपवून व्यासपीठाच्या खुर्चीवर विराजमान झाले. त्यावेळी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नितेश राणे यांची पाठ थोपटली. खासदार विनायक राऊत यांनी जाहिर भाषणात आपण आणि नितेश राणे मित्र असल्याचं बोलून दाखवलं. मी नितेश राणे यांचे अभिनंदन करतो. अभिनंदन करायला सुद्धा मोठं मन लागतं असं सांगत खासदार विनायक राऊत यांनी कोकणातले राजकीय नेते विकासकामांसाठी एकत्र येतात याची झलक दाखवली.