लोणावळा : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या उपस्थितीत, लोणावळ्यात काँग्रेस कार्यक्रर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी, “पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे बारामतीचे, मात्र कोणत्याही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या ते कामाला येत नाहीत. पालकमंत्री हा जो त्रास देतात, त्या त्रासालाच तुम्ही आपली ताकद बनवा,” असा उपदेश कार्यकर्त्यांना केला आहे.
संजय राठोड यांचं होणार पुनर्वसन? मंत्री मंडळातल्या प्रवेशाबद्दल म्हणाले…
तसेच, ”काँग्रेस स्वबळावर लढणार, मी अनेकदा बोललो आहे. मी आता माघार घेणार नाही. या स्वबळाच्या लढाईला आपण कामाला लागा. मुख्यमंत्र्यांनीही आपल्या शिवसैनिकांना हेच सांगितलं आहे, पण सगळ्यांना मीच दिसतो,” असं म्हणत त्यांनी माध्यमांवर निशाणा साधला.
शिवसेनेकडून ऑफर? उज्ज्वल निकम यांनी दिली प्रतिक्रीया
दरम्यान, यावर भाजपकडून नाना पटोले आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधण्यात आला असून, भाजप राज्य मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत, “नानाजी काय तुमची अवस्था? काँग्रेसमुळे जे सत्तेत आहेत, तेच प्रदेशाध्यक्षांविरोधात काम करीत आहेत. थेट प्रदेशाध्यक्षांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, अजित पवार पाळत, फोन टॅप तरी कॅाग्रेस गप्प… ना सत्तेत कॅाग्रेसला कुणी विचारत, ना काँग्रेसमध्ये तुम्हाला असं चित्र आहे हे,” अशी सणसणीत कोपरखळी मारली आहे.
सहकार हा विषय राज्य सरकारचाच, महाराष्ट्रात गंडांतर येणार नाही
काल प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी, ”बारामतीत कॉंग्रेसला मानणारा वर्ग आहे. तिथे मला वेगळे प्लॅनिंग करावे लागेल. तिथे होणाऱ्या व्यवस्थेच्या अंतर्गत होणारा अत्याचार, आणि त्या विरोधात जो उद्रेक आहे, त्याची मला माहिती आहे. परंतु, आपल्याला पुढे जायचे असेल, तर शत्रूला घरातच जाऊन मारले पाहिजे,” असा खोचक टोला त्यांनी राष्ट्रवादीला आणि उपमुख्यमंत्र्यांना नाव न घेता लगावला. त्यामुळे लवकरच राज्यात राजकीय खळबळ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
Read Also ;
- “गैरसमजात राहू नका, माझं तिकीट कुणीही कापू शकत नाही”
- “एकतर सगळे निर्बंध कायमचे काढून टाका किंवा संपूर्ण लॉकडाऊन करा!”
- भाजपला सर्वात मोठा धक्का! पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार, राजकीय चर्चेला उधान
- सोबत राहून पाठीत सुरा खुपसायचा आणि बोलायचे नाही; नाना पटोले यांची शिवसेना-राष्ट्रवादीवर टीका
- देश उलथवून टाकण्याच्या कटात हा ‘म्हातारा’ म्हणे सामील होता, कोणता देश? कोणाचा देश?