नागपूर : राज्यात अनेक महापालिकांच्या निवडणूका आगामी काळात येणार आहेत. राज्यातील सर्व पक्ष या निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. पक्ष बांधणी, संघटना बांधणीला जोर आला आहे.
“एकतर सगळे निर्बंध कायमचे काढून टाका किंवा संपूर्ण लॉकडाऊन करा!”
भाजपनेही नागपूर महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागली असून, राज्यच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल नगरसेवकांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी, गैरसमजात राहू नका, माझे तिकीट कुणीही कापू शकत नाही,” असा इशारा हितचिंतकांना आणि विरोधकांना दिला आहे.
भाजपला सर्वात मोठा धक्का! पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार, राजकीय चर्चेला उधान
यावेळी, त्यांनी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांची खबरबात घेतली आणि कानपिचक्याही दिल्या. “पक्षाची शिस्त जपा, आपल्यामुळे पक्षाचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्या! आपसात स्पर्धा करणाऱ्या नगरसेवकांवर पक्षाचे लक्ष आहे. हे असले प्रकार त्यांनी तात्काळ थांबवावे आणि एकजुटीने काम करावे. भाजपचे मिशन महापालिका सुरू झाले आहे,” असा मोलाचा सल्ला देखील त्यांनी दिला.
सोबत राहून पाठीत सुरा खुपसायचा आणि बोलायचे नाही; नाना पटोले यांची शिवसेना-राष्ट्रवादीवर टीका
तसेच, “महापालिका निवडणुकीला अजून ६ महिन्यांचा कालावधी आहे. चार नगरसेवकांचा एक प्रभाग असल्याने, काही मोजकेच नगरसेवक काम करत आहेत. मात्र, आपल्याच पक्षात आपल्यापेक्षा दुसरा मोठा होऊ नये, अशी काळजी काहीजण घेत आहेत,” असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
देश उलथवून टाकण्याच्या कटात हा ‘म्हातारा’ म्हणे सामील होता, कोणता देश? कोणाचा देश?
दरम्यान, या बैठकीला भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, महापौर दयाशंकर तिवारी, सत्तापक्षनेते अविनाश ठाकरे, स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश भोयर, आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते यांच्यासह आजी-माजी आमदार उपस्थित होते.
Read Also :
- आम्ही काका-पुतण्याच्या ताटाखालचे मांजर नाही, काँग्रेस नेत्यांची पवारांवर टीका
- भास्कर जाधवा यांच्या ‘त्या’ इच्छेला बाळासाहेब थोरातांचा ब्रेक, म्हणाले, ‘काँग्रेसमध्येही असे अनेक भास्कर जाधव!
- राहुल गांधींना राष्ट्रीय नेता बोलल्याचं बैलांना आवडलं नसेल; फडणवीसांची काँग्रेसवर खोचक टीका
- मनसेची ठरणार पुणे महापालिका निवडणुकीसाठी रणणीती; राज ठाकरे दोन दिवस पुण्यात मुक्कामी
- मुख्यमंत्री वारंवार सांगूनही ऐकत नसेल, तर मी मातोश्रीसमोर जाऊन बेशरमाचं झाड लावणार?