जळगाव : आज जळगाव दौऱ्यावर असलेल्या नगरविकासमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी, राज्याचे विशेष सरकारी वकील अॅ. उज्ज्वल निकम यांची, त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. जवळपास १५ ते २० मिनिटं त्यांच्यात चर्चा झाली. या भेटीची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. यावेळी त्यांच्यात कोणती चर्चा झाली, याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
“गैरसमजात राहू नका, माझं तिकीट कुणीही कापू शकत नाही”
मात्र, उज्ज्वल निकम यांनी शिवसेनेत प्रवेश करावा यासाठी नेत्यांकडून प्रयत्न सुरु असल्याचं बोललं जात आहे. याआधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील जळगाव दौऱ्यावर असताना उज्ज्वल निकम यांची भेट घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उज्ज्वल निकम यांना राज्यसभेवर जाण्यासाठी ऑफर दिली होती.
सहकार हा विषय राज्य सरकारचाच, महाराष्ट्रात गंडांतर येणार नाही
दरम्यान, उज्ज्वल निकम यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून, मी अद्याप राजकारणात येण्याचा विचार केलेला नाही़ असं त्यांनी म्हटलं आहे. “एकनाथ शिंदेंसोबत झालेल्या चर्चेचा मला तपशील सांगता येणार नाही. पूर्वी मी पवारांचाही प्रस्ताव नाकारला होता. गेल्या महिन्यातील माझी आणि राऊत यांची भेट, केवळ सदिच्छा भेट होती. सर्वच पक्षातील नेत्यांशी माझे चांगले संबंध आहेत,” असं त्यांनी सांगितलं आहे.
Read Also :
- “एकतर सगळे निर्बंध कायमचे काढून टाका किंवा संपूर्ण लॉकडाऊन करा!”
- भाजपला सर्वात मोठा धक्का! पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार, राजकीय चर्चेला उधान
- सोबत राहून पाठीत सुरा खुपसायचा आणि बोलायचे नाही; नाना पटोले यांची शिवसेना-राष्ट्रवादीवर टीका
- देश उलथवून टाकण्याच्या कटात हा ‘म्हातारा’ म्हणे सामील होता, कोणता देश? कोणाचा देश?
- आम्ही काका-पुतण्याच्या ताटाखालचे मांजर नाही, काँग्रेस नेत्यांची पवारांवर टीका