अहमदनगर: महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकमेकांवर आरोप करत जनतेला वेड्यात काढण्याचे काम करत आहेत. शेतकरी, सामान्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष व्हावे म्हणूनच ते एकमेकांविरुद्ध लढण्याचे नाटक करत आहेत आणि आव आणत आहेत. परंतु जनतेने देखील या तिन्ही पक्षांच्या नाटकीपणापासून सावध राहावे आणि स्वतःला वाचवावे असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले आहे. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या नगर शहरातील आरोग्य केंद्राचे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
हे पण वाचा, ‘‘चांगल्या गोष्टींसाठी केलेला बेकायदेशीर मार्गाचा वापर, कधी शुद्ध नसतो’’; न्यायालयाने सुजय विखेंना सुनावले
हे पण वाचा, विखे-पवार जुने वाद तरी रोहित पवारांनी केली सुजय विखेंसोबत छुपी युती, काय आहे कारण?
यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले यांच्या उपस्थितीत कार्यक्रम करण्यात आला. खासदार विखे म्हणाले की महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना लोकांनी एकत्र निवडून दिलेले नाही, कोणाला पैसे कमी पडत होते म्हणून ते कमवण्यासाठी तर कोणी अन्य काही कारणांसाठी अशा पद्धतीने ते लाचारीने एकत्र आले आहेत. उद्या महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका ते स्वतंत्र निवडणूक लढवतील व पुन्हा लोकसभेला नरेंद्र मोदी यांना विरोध करण्यासाठी एकमेकाला चिकटतील अशी टीकाही खासदार विखे यांनी केली आहे.
हे पण वाचा, “……तर मी खासदारकीचा राजीनामा देतो”; डॉ.सुजय विखे यांचा इशारा
हे पण वाचा, …तर आता मलाच संरक्षणमंत्री व्हावे लागेल – सुजय विखे
खासदार प्रीतम मुंडे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश न केल्याने जिल्ह्यातील अनेक मुंडे समर्थकांनी राजीनामे दिले आहेत यावर खासदार विखे म्हणाले की भारतीय जनता पक्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वजण पालन करतात. पंकजा मुंडे यांनी आपण नाराज नसल्याचे सांगितले आहे मात्र आपला नेता मंत्री व्हावा, अशी सर्वच कार्यकर्त्यांची भूमिका असते. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे भारतीय जनता पक्षामध्ये मोठे योगदान आहे. कार्यकर्ते जरी नाराज असले तरी पकंजामुंडे नक्कीच नाराज नाहीत असे देखील खासदार विखे यांनी म्हटले आहे.
हे पण वाचा,
केंद्रीय मंत्रीमंडळात नारायण राणेंना स्थान, मुंडे भगीनींचे पंक छाटण्याचा प्रयत्न?
नॉट रिचेबल’ असणाऱ्या नारायण राणेंचा अखेर फोन लागला; राज ठाकरेंनी मंत्रिपदासाठी दिल्या शुभेच्छा
नारायण राणे इन्व्हेस्टमेंट अँड ग्रोथ कमिटीवर, कुणाला कोणती मिळाली कमिटी; वाचा सविस्तर
“मी मंत्री झालो, मुंडे साहेब माझे नेते” पंकजांच्या भेटीनंतर भागवत कराडांना गोपीनाथ मुंडेंची आठवण
शिवसेनेला मोठा धक्का, माजी राज्यमंत्री पटोलेंच्या उपस्थितीत करणार काँग्रेसमध्ये प्रवेश