वर्धा: एकीकडे प्रवेशाचा गोंधळ टाळण्यासाठी महाविकास आघाडीची समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय झालेला असतानाच शिवसेनेला काँग्रेसने धक्का दिला आहे. शिवसेनेचे उपनेते आणि माजी राज्यमंत्री काँग्रेसच्या वाटेवर आहेत. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अशोक शिंदे हे काँग्रेसचा झेंडा हाती धरत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत शिंदे काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे.
हे पण वाचा: विधान परिषद १२ आमदार नियुक्तीचा पेच कायम : राज्यपालांनी ८ महिने उलटूनही निर्णय घेतला नाही
हे पण वाचा: “…तर भाजपचे १२ नाही १८ आमदार निलंबित झाले असते”, निलंबनावर अजित पवारांचं भाष्य
डावलल्यामुळे अशोक शिंदे नाराज
अशोक शिंदे हे हिंगणघाट मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिले आहेत. माजी राज्यमंत्री असलेल्या शिंदेंकडे सध्या शिवसेनेचे उपनेतेपद आहे. १९९५ मध्ये शिंदे शिवसेनेच्या तिकिटावर पहिल्यांदा आमदार झाले होते. मात्र पक्षाकडून मागील काही दिवसांपासून स्थानिक पातळीवर डावलले गेल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती.
हे पण वाचा: “मी मंत्री झालो, मुंडे साहेब माझे नेते” पंकजांच्या भेटीनंतर भागवत कराडांना गोपीनाथ मुंडेंची आठवण
हे पण वाचा: आत्ता लोकसेवा करण्याची वेळ, मंत्रीपद मागण्याची नाही, पंकजा मुंडेच्या उपस्थितीत मोदींनी सुनावले खडे बोल
शिवसेनेच्या माजी खासदारासोबत तीव्र मतभेद
शिवसेनेचे वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख आणि माजी खासदार अनंत गुढे आणि अशोक शिंदे यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. अशोक शिंदे यांनी मुंबईला जाऊन शिवसेना पक्षनेतृत्वाकडेही गुढे प्रकरणात न्याय मागितला होता, परंतु सेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांची दखल घेतली नसल्याचं बोललं जातं. त्यानंत अशोक शिंदेंनी शिवबंधन सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय निश्चित केला आहे.
हे पण वाचा: पंकजा मुंडेंना गमावतीये का भाजप? आणखीन ७७ पदाधिकाऱ्यांनी ठोकला पक्षाला रामराम
कोण आहेत अशोक शिंदे?
अशोक शिंदे हे वर्ध्यातील हिंगणघाट मतदारसंघातून १९९५, १९९९ आणि २००९ असे तीन वेळा शिवसेनेकडून आमदार म्हणून राहले आहेत. त्यांचा २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराकडून पराभव झाला. सध्या अशोक शिंदेंकडे शिवसेनेचे उपनेतेपद आहे. तसेच मनोहर जोशी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात शिंदेंकडे राज्यमंत्रिपद होते.
नाना पटोलेंच्या उपस्थितीत काँग्रेस प्रवेश
मुंबईत आज (मंगळवार) दुपारी दोन वाजता अशोक शिंदे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडल्यापासून नाना पटोले यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा एल्गार केल्यापासूनच पटोलेंच्या नेतृत्वात अनेक नेत्यांचे पक्षप्रवेश होऊ लागले आहेत. अशोक शिंदेही नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा झेंडा हाती धरतील.