पुणे : पुणे महापालिका क्षेत्रात कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. पुण्याचे महापौर मात्र खोट्या आकडेवारीची धूळफेक करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे, पुणे महापालिकेच्या कोविड हेल्पलाईनने कॉलर ट्यून म्हणून ‘बेड उपलब्ध नाहीत, आत्मनिर्भर व्हा’ हे वाक्य ठेवलं पाहिजे, अशी सणसणीत टीका राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्या रुपाली चाकणकर यांनी पुणे महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांवर केली आहे. त्यांनी व्टिटरच्या माध्यमातून टोला लगावला आहे.
फरफट थांबवण्यासाठी महापालिकेने डॅशबोर्ड वर माहिती अद्ययावत ठेवणे गरजेचे असते. प्रत्यक्षात मात्र महानगरपालिकेच्या डॅशबोर्ड वर चुकीची माहिती उपलब्ध असल्याचं निदर्शनास आलं आहे. प्रत्यक्षात कुठेही बेड उपलब्ध नसताना डॅशबोर्ड वर अनेक बेड्स उपलब्ध असल्याचं 2/3
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) May 15, 2021
पुणे शहराला कोरोनाने घट्ट मिठीत घेतले आहे. दररोज हजारोच्या घरात नागरिक कोरोना पॉझिटिव येत आहेत. गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड मिळत नाहीत, अशी स्थिती आहे. रुग्ण त्यांचे कुटूंबीय, नातेवाईक बेड तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी या रुग्णालयातून त्या रुग्णालयात धावाधाव करत आहेत. अपुऱ्या सुविधे पोटी शहरातील अनेकांचे हाकनाक बळी जात आहेत. पुण्याचे महापौर मात्र खोट्या आकडेवारीची धूळफेक करण्यात व्यस्त आहेत.
माहितीच्या अभावी होणारी रुग्णांची फरफट थांबवण्यासाठी महापालिकेने डॅशबोर्ड वर माहिती अद्ययावत ठेवणे गरजेचे असते. प्रत्यक्षात मात्र महापालिकेच्या डॅशबोर्ड’वर चुकीची माहिती उपलब्ध असल्याचं निदर्शनास आलं आहे. प्रत्यक्षात कुठेही बेड उपलब्ध नसताना डॅशबोर्ड वर अनेक बेड्स उपलब्ध असल्याचं पुणे महापालिकेतर्फे दाखवण्यात आलं. पुणे महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांचा हा बुरखा काल मुंबईत उच्च न्यायालयात फाटला. पुणे महानगरपालिकेची ही लबाडी उच्च न्यायालयात उघडकीस आल्याने सर्व पुणेकरांची मान शरमेने खाली गेली आहे. त्यामुळे, पुणे महापालिकेच्या कोविड हेल्पलाईनने कॉलर ट्यून म्हणून ‘बेड उपलब्ध नाहीत, आत्मनिर्भर व्हा’ हे वाक्य ठेवलं पाहिजे, अशी टीका चाकणकर यांनी केली आहे.