नवी दिल्ली : हाथरास पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना अटक करण्यात आली आहे. कलम १८८ अंतर्गत त्यांना अटक करण्यात आली आहे
सलग दोन दिवसांतील सामूहिक बलात्कार प्रकरणांनी यूपीसह संपूर्ण देश हादरला आहे. दोन्ही घटनांतील पीडितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधींसह हाथरसच्या दिशेने रवाना झाले होते. ते हाथरस पीडितेच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांची विचारपूस करणार होते.
राहुल गांधीआणि प्रियंका गांधी हाथरसमध्ये येणार असल्याने, हाथरस जिल्ह्याची सीमा आज (1 ऑक्टोबर) पूर्णपणे सील करण्यात आली आहे. याशिवाय जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे. या अंतर्गत 5 किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
Read Also :
छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती उदयनराजे यांनी मराठा समाजाचे नेतृत्व करू नयेhttps://t.co/uStoVT4wOM#MarathaReservation @YuvrajSambhaji @Chh_Udayanraje
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 1, 2020