वायनाड : मध्य प्रदेशात पोटनिवडणुकीसाठी सध्या प्रचार सुरू आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी भाजपच्या उमेदवार इमरती देवी यांचा ‘आयटम’ असा उल्लेख केला होता. त्यावरून राजकारण तापलं असून या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. इमरती देवी यांनी कमलनाथ यांच्यावर हल्लाबोल केलाय. कमलनाथ हे तर कलंकनाथ आहेत. मी त्यांना राक्षस समजते अशी टीका त्यांनी केली. एका प्रसार सभेत कलमनाथ यांनी ‘आयटम’ असा उल्लेख केल्याने मध्य प्रदेशात वादळ निर्माण झालं होतं. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मौन आंदोलन करत याचा निषेध केला आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना मंगळवारी चांगलच फटकारलं. कमलनाथ यांनी भाजपच्या उमेदवार आणि माजी मंत्री इमरती देवी यांच्याबद्दल ‘आयटम’ शब्द वापरल्यामुळे देशभर वाद निर्माण झाला होता. त्यावरून राहुल गांधी यांनी त्यांना ही समज दिली. राहुल हे सध्या आपला मतदारसंघ असलेल्या वायनाडच्या दौऱ्यावर आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात विचारलेल्या एका प्रश्नावर कमलनाथ यांच्याबद्दल राहुल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
राहुल गांधी म्हणाले, कमलनाथ हे काँग्रेस पक्षाचे आहेत, मात्र अशा प्रकारची भाषा योग्य नाही. कुठल्याही नेत्याला अशी भाषा वापरणं हे चांगलं नाही. मला अशी भाषा वापरणे हे मुळीच आवडलेलं नाही. असं वक्तव्य हे दुर्दैवी आहे असंही ते म्हणाले. मध्य प्रदेशमध्ये सध्या पोट निवडणुकीसाठी प्रचार सुरू आहे. एका प्रचारसभेत बोलताना कमलनाथ यांनी वादग्रस्त वक्तव्य दिलं होतं.
#WATCH Kamal Nath ji is from my party but personally, I don't like the type of language that he used…I don't appreciate it, regardless of who he is. It is unfortunate: Congress leader Rahul Gandhi on the former Madhya Pradesh CM's "item" remark pic.twitter.com/VT149EjHu0
— ANI (@ANI) October 20, 2020
कमलनाथ यांनी एका निवडणूक सभेत म्हणाले की, मी जे काही म्हणालो, तो अपमान नव्हता. मी असं काही ठरवून म्हणालो नव्हतो..मला त्या व्यक्तीचं नाव लक्षात येत नव्हतं. ज्याचं नावच लक्षात नाही त्यांना काय म्हणू मी…आज ज्याप्रमाणे आपल्या व्यासपीठावर आयटम नंबर 1 आहेत राजनारायण सिंह, आयटन नंबर 2 अजय सिंहजी…या यादीत आयटन नंबर 1, आयटम नंबर 2..आयटम नंबर 3 असं नावं आहेत. मात्र शिवराज सिंह तर कारण शोधत आहेत असं म्हणत त्यांनी सावरासावर करण्याचा प्रयत्न केला.
Read Also :
‘राज्याने केंद्राकडे कर्जाची मागणी केल्यास फडणवीसांनी ते मंजूर करून घ्यावं’ https://t.co/lpvq3RN9Je @Prksh_Ambedkar @Dev_Fadnavis @Devendra_Office @BJP4Maharashtra @CMOMaharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 20, 2020