राजस्थानामधील काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत सत्तानाट्यानंतर पक्षाने उपमुख्यमंत्रिपद आणि प्रदेशाध्यक्ष पदावरुन सचिन पायलट यांची हकालपट्टी केली. यानंतर आता राजस्थानमधील अनेक काँग्रेस नेत्यांनी त्यांचा समर्थनार्थ आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे.
राजस्थान युवक काँग्रेसचे अध्यक्ष अभिमन्यू पूनिया यांनी देखील राजीनामा दिला आहे. राजस्थानमधील जवळपास 300 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. राजस्थान प्रदेश काँग्रेस समितीतील जवळपास 30 पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिल्यानंतर पक्षाचे प्रभारी अविनाश पांडेय यांनी राज्याची पक्ष कार्यकारिणी बरखास्त केली आहे.
सचिन पायलट यांना पदावरुन हटवल्यानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरु झाले आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे.