IMPIMP
con con

‘नितिन राऊत यांना कोणतेही अधिकार नसतील तर, पोकळ घोषणा करू नयेत’

कोल्हापूर : राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वाढीव वीज बिल माफ केली जाणार नाही, असे म्हटले होते. यावरून आता सर्वसामान्यांसह विरोधी पक्षांकडून सरकारवर निशाणा साधला आहे. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील सरकारला इशारा देत लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीजबिले कदापि भरणार नाही, सरकारने सक्तीने वसूल केल्यास त्याचे तीव्र पडसाद उमटतील म्हटले आहे.

नितीन राऊत यांनी दिवाळीला गोड बातमी देऊ असे म्हटले होते. वीजबिले वसूल करणार, ही काय गोड बातमी आहे काय?,  असा टोला शेट्टी यांनी लगावला.

नितिन राऊत यांना कोणतेही अधिकार नसतील तर, पोकळ घोषणा करू नयेत, या अगोदर त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारून मगच घोषणा करावी. कोणतीही घोषणा करताना ऊर्जामंत्र्यांनी आपल्या वरिष्ठांची परवानगी घ्यावी, बेजबाबदारपणे कोणतीही घोषणा करू नये, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी राऊत यांना दिला.

राज्य सरकारने वीज बिल माफ करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. वीज बिलं माफ केली नाहीत तर शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करु, असा इशारा राजू शेट्टींनी दिला.