मुंबई: आज होळीचा सण आहे. दरवर्षी देशभरासहित महाराष्ट्रात होळीचा सण साजरा केला जातो. यंदा मात्र राज्य सरकारने होळीचा सण साजरा करत असताना काही निर्बंध लावले आहेत. होळी साजरी करत असताना होळी रात्री १०च्या आत पेटवावी असं बंधन राज्य सरकारकडून घालण्यात आलं आहे.
अटकेपासून संरक्षणाची मागणी कोर्टाने फेटाळली; मुंबै बँक फसवणूक प्रकरणात प्रवीण दरेकरांचा पाय खोलात
सध्या १० आणि १२विची परीक्षा सुरु असल्या कारणाने विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी डीजे बरोबरच मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावण्यासही बंदी घालण्यात आलेली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईची तरतूद गृहविभागाने काल संध्याकाळी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक नियमावलीत करण्यात आली आहे.
दरेकरांना अटक झाली, की ते फरार झालेत? मनिषा कांयदेचा भाजपला तिखट सवाल
नियमांचे पालन न करणाऱ्या कठोर कारवाई करण्यात येईल असा आदेश राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी दिलेला आहे. यावरून भाजपचे आमदार राम कदम यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्र सरकारचा हिंदू सणांना इतका टोकाचा विरोध का ? तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात, आम्ही आमचा हिंदू सण जल्लोषात साजरा करणारच असा इशाराही राम कदम यांनी दिला आहे.
मुंबै बँकेत घोटाळा: अजित पवारांच्या जवळचे ६ संचालक सामील – प्रवीण दरेकांचा दावा
आमदार राम कदम यांनी ट्विट करत याबद्दल संताप व्यक्त केला आहे. हा शिवरायांचा महाराष्ट्र्र आहे. इथं हिंदूंचे सण साजरे होणार आहेत. आम्हाला कळते स्वतःची कशी काळजी घ्यायची. तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात. तुमच्याच भाषेत काय उखाडायचे ते उखाडा. आम्ही आमचा हिंदू सण जल्लोषात साजरा करणारच असा इशारा राम कदम यांनी सरकारला दिला आहे.
गृहखात्याकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे ज्यामध्ये सांगण्यात आलं आहे की होळी १०च्या आत पेटवावि, डीजेला बंदी, लाऊडस्पीकरचा आवाज मोठा केल्यास कारवाई, मद्यपान तसेच बिभत्स वर्तन केल्यास कारवाई, धुलीवंदनाच्या दिवशी जबरदस्तीने रंग लावू नये, पाण्याचे फुगे फेकू नयेत असे नियम यामध्ये आहेत.